भारतीय श्रमिक वस्तूंना FTA टेरिफमधून सुट मिळण्याची शक्यता - ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिऐटीव्ह
नवी दिल्ली: जीटीआरआय ( ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिऐटीव्ह ) ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी Free Trade Agreement (FTA) अंतर्गत भारताच्या श्रमिक कारागीर वस्तूंना विशेषतः पादत्राणे, कपडे, कार्पेट, चारचाकी यांना युकेमध्ये आयात करातून सुट मिळू शकते. जरी करारातील तरतूदीत निर्यातीतील वस्तूंवर झिरो किंवा कमी टेरिफ आकारले जाणार असल्याने मर्यादित नफा भारताला मिळू शकतो.
आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये भारताची निर्यात ११.४१ अब्ज डॉलर होती. त्यातील ६ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने, औषधे, मशिन पार्ट, एअरप्लएन, वूडन फर्निचर या ड्युटीविरहीत आहेत असे सांगण्यात आले.
मात्र युकेमधून भारतातील केलेली आयात बघता ८.९६ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तूंची होती.एकूण आयातीपैकी ९१ टक्के आयात ही मोठे कर आकारणीतून झालेली आहे.GTRI च्या माहितीनुसार, FTA मध्ये इंग्लंडमधील ट्रेडर्सला विनाशुल्क करारामुळे फायदा होणार आहे.