अखेर 'त्या' परिवाराला घराचा ताबा देण्यास पालिकेचा होकार

अखेर "त्या" परिवाराला घराचा ताबा देण्यास पालिकेचा होकार

    01-Aug-2022   
Total Views |
mla  

 
मुंबई : दक्षिण मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरील वसाहतीत राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला घराबाहेर काढण्याच्या घटनेवरून बराच गदारोळ माजला होता. संबंधित कुटुंबाला घराचा ताबा देण्याची मागणी करत शनिवार, दि. ३० जुलै रोजी काही हिंदू संघटनांकडून महापालिका कार्यालयाबाहेर आंदोलन देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

यासर्व प्रकरणात पीडित जोगडिया कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आपल्या हक्काच्या घरी पुन्हा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार, दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी महापालिकेच्या प्रभाग 'बी' कार्यालयात झालेल्या बैठकीत जोगडिया कुटुंबाला घराचा ताबा देण्याचा निर्णय झाला असून प्रशासनाने पीडितांचे घर सील करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जोगडिया परिवार आणि आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
 


आ. मंगलप्रभात लोढांच्या मध्यस्तीला यश

मोहम्मद अली रोडवरील वसाहतीत राहणाऱ्या या कुटुंबाला काही विशिष्ट्य समाजातील घटकांकडून प्रताडित करण्यात आले असून त्यांच्याद्वारे हिंसेचा वापर करून जोगडिया कुटुंबाला बेघर करण्यात आल्याचे गंभीर आरोप संबंधितांकडून लावण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगला प्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबासोबत प्रभाग बी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी केलेल्या मध्यस्तीनंतर जोगडिया कुटुंबाला त्यांच्या घरी परत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आ. लोढा यांनी केलेल्या मध्यस्तीमुळे एक कुटुंब बेघर होण्यापासून वाचले आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.