नवी दिल्ली: ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’च्या (एनएसई) कर्मचार्यांच्या कथित ‘फोन टॅपिंग’शी संबंधित ‘मनीलॉण्ड्रिंग’ प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीनंतर अटक केली.
हवालाप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मंगळवारी अंमलबजावणी ‘ईडी’समोर चौकशीसाठी हजर झाले होते. ‘ईडी’तर्फे सलग दुसर्या दिवशी पांडे यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना ‘एनएसई’च्या ‘सिक्युरिटी ऑडिट’साठी त्यांनी त्यांनी सुरू केलेल्या कंपनीच्या व्यवसाय आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारले. यावेळी त्यांचा जबाब ‘पीएमएलए कायद्या’अंतर्गत नोंदविण्यात आला. त्यानंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ने पांडे आणि त्याची दिल्लीस्थित कंपनी ‘आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एनएसई’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.