मान्सूनपूर्व कामांना गती कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2022   
Total Views |


vrukshatod 3
 
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईकरांना नुकतेच वरुणराजाचे दर्शन झाले असून पहिल्या पावसाची सरदेखील मुंबईकरांच्या अंगावर नुकतीच ओलावा निर्माण करून गेली आहे. मे महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडला असून येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनच्या अनुषंगाने मुंबईतील मान्सूनपूर्व कामे कधी पूर्ण होणार आणि त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही शहरात वृक्ष पडून अपघात होण्याच्या घटनांचे प्रमाण कायम असून त्यातून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
 
  
 
वृक्षछाटणीची आवश्यकता
 
सर्वसाधारणपणे पावसाळ्याची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात होत असल्याने नालेसफाई अथवा इतर मान्सूनपूर्व कामांचा निपटारा तत्पूर्वी होणे आवश्यक आहे. साधारणपणे एप्रिल-मे दरम्यान उन्हाने वाळत जाणारी झाडे पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते, त्यांची तोड होणे गरजेचे असते. जूनमध्ये येणार्‍या मान्सूनच्या आधीच म्हणजे मेच्या मध्यापर्यंत ही कामे होणे अपेक्षित असते. परंतु, आता मे संपत आला, तरी शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक झाडांची तोड होणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
कामगार प्रशिक्षितच!
 
दरम्यान ढिम्म गतीने कामाला लागलेल्या मुंबई महापालिका प्रशासनातर्फे वृक्षतोडणीसाठी ठेवण्यात आलेल्या कर्मचार्‍यांवरूनही एक नवा वाद काही दिवसांपूर्वी उद्भवला होता. महापालिकेतर्फे या कामासाठी लावण्यात आलेले कामगार आणि सुमारे १५० सदस्यांची टीम ही पूर्णतः प्रशिक्षित असून ते पद्धतीनुसारच शहरातील वृक्षतोडणीची प्रक्रिया राबवित आहेत, याबाबत कुठलेही गैरसमज नाहीत, अशी स्पष्टोक्ती उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली आहे.
 
 
 
मुंबईत वृक्ष कोसळून जीवितहानी
 
मुंबईत वर्षभरात साधारण एक हजार झाडे कोसळतात. पावसाळ्यात झाडे कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यादरम्यान जीवितहानी होण्याचीही भीती असते. वर्षभरात साधारण पाच ते सहा व्यक्ती वृक्ष किंवा फांद्या कोसळून दगावतात. मागील वर्षीदेखील उपनगराचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात झाड अंगावर पडून मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी दुर्लक्ष केल्याने मुंबई महापालिका आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात तीव्र संतापाची लाट दिसून आली होती.
 
 
 
 
 
vrukshatod 2 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@