भाजयुमो उपाध्यक्षांचा मृत्यू गळफासामुळे : शवविच्छेदन अहवालातून निष्कर्ष

    11-May-2022
Total Views |
 
 
 
Arjun Chaurasia
 
 
  
 

कोलकाता: पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पार्टी युवा मंडल मोर्चाचे उपाध्यक्ष अर्जुन चौरसिया यांची शवविच्छेत्याची रिपोर्ट नुकताच जारी करण्यात आली आहे. शवविच्छेदानाच्या रिपोर्टच्या तपशीलानुसार, त्यांची मृत्यू गळफास लावल्यामुळे झालेले असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी, कोलकाता उच्च न्यायालयात प्रस्तुत केल्या गेलेल्या रिपोर्टानुसार, अर्जुनच्या मानेवर फाशीच्या खुणा आढळण्यात आल्या. दरम्यान, भाजप ने तृणमूल काँग्रेस वर अर्जुनच्या हत्येचा आरोप लावला आहे.
 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बंगाल दौऱ्याच्या दरम्यान अर्जुनचे शव कोलकत्यामध्ये आढळले होते. या सर्व घाटाने नंतर, केंद्रीय गृहमंत्र्यांनी अर्जुनच्या घरच्यांना देखील भेट दिली व याबाबत सीबीआय चौकशीची देखील मागणी केली. या प्रकरणी गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे. मागील काही वर्षांपासून, बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या हत्येची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.