मुंबई बजेट २०२२ - २३ : अर्थसंकल्पात स्वच्छतेला ठेंगा!

    03-Feb-2022
Total Views |
mumbai garbage 
 
 
 

मुंबई: मुंबई महापालिकेकडून यावर्षीचा वार्षिक अर्थसंकल्प जाहिर करण्यात आला आहे. एकुण ४५,९४९ कोटींच्या या अर्थसंकल्पात अनेकविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकारी रुग्णालये उभारणीसाठी १५० कोटींची तरतूद केली असताना आजार होऊचं नये यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे.

 
एकंदरीत अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनाचा २०३० पर्यंतचा दृष्टीक्षेप ठेवणाऱ्या महापालिकेने २०२२ साठी काय नियोजन केले आहे? हे सांगणे मात्र प्रकर्शाने टाळले आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका आता नव्याने १०० ई-वाहने समाविष्ठ करणार आहे. परंतू यासर्व कचरा व्यवस्थापनाच्या बाबींसाठी एकुण २ कोटींच्या खर्चाची तरतूद करणे हास्यास्पद म्हणाव लागेल.

 
मुंबई शहरात एकुण ८२८ स्वच्छतागृह उभारण्याचे लक्ष्य ठेवलं आहे, ज्यापैंकी ५६२ स्वच्छतागृहांचे बांधकाम पुर्ण झाले असून २६६ स्वच्छतागृह एप्रिल २०२२ पर्यंत बांधून पुर्ण होतील असे आशावादी चित्र महापालिकेने दाखवले आहे. मात्र, याकामासाठी किती रुपये खर्च करणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आता महापालिका आणि सत्ताधारी मुंबई स्वच्छ रहावी यासाठी किती आशावादी आणि महत्त्वकांक्षी आहेत हे ठळकपणे दिसून येत आहे.