मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2022   
Total Views |
 
corona
 
 
 
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी आकडेवारी मागील काही दिवसांपासून मुंबईकरांचे टेन्शन वाढवताना दिसून येत आहे. मंगळवार, दि. ४ जानेवारी रोजी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात अकरा हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची करण्यात आली आहे. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
मुंबईत मंगळवारी सुमारे १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत असून २ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, ६५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ५२ हजार ०१२ वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत सध्या ४७,४७६ रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर ११० दिवसांपर्यंत खाली येऊन ठेपला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@