दोन वर्षात कोकणातील वनक्षेत्रात ५ चौ.किमीची घट; सिंधुदुर्गात घट अधिक

    20-Jan-2022   
Total Views | 249
forest



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
भारतीय वनसर्वेक्षण अहवाल, २०२१ नुसार राज्यातील वनक्षेत्रात वाढ झाली असली, तरी कोकणातील वनक्षेत्र ( konkan forest ) मात्र घटले आहे. खास करुन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेली घट अहवालामधून निदर्शनास आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. ( konkan forest ) 
 
नुकताच देशाचा वनसर्वेक्षण अहवाल प्रकाशित झाला. गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय वनाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या 'भारतीय वन सर्वेक्षण' विभागाकडून या संदर्भातील काम करण्यात येते. हा विभाग दर दोन वर्षांनी भारतातील वनांचे राज्यानुरुप सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल प्रकाशित करतो. २०२१ च्या अहवालानुसार राज्यातील वनक्षेत्रात २० चौ.किमी क्षेत्राची वाढ झाली. परंतु, कोकणातील दोन जिल्ह्यातील वनक्षेत्रात कमालीची घट झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. अहवालानुसार २०१९ च्या तुलनेत रत्नागिरीचे वनक्षेत्र ०.९६ चौ.किमीने आणि सिंधुदुर्गचे वनक्षेत्र ४.३० चौ.किमीने घटले आहे. ( konkan forest )

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कांदळवन क्षेत्रामधील घटही वनसर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे. सिंधुदुर्गचे कांदळवन क्षेत्र ०.९८ चौ.किमीने घट झाली आहे. उलटपक्षी रायगड जिल्ह्यातील वन आणि कांदळवन क्षेत्रात मात्र कमालीची वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यामधील दोन्ही वन परिसंस्थांमधील वाढ ही अनुक्रमे राज्यात दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर आहे. रायगडच्या वनक्षेत्रात २०१९ सालच्या तुलनेत ११.५५ चौ.किमीची वाढ झाली आहे. ही वाढ राज्यातील जिल्ह्यानुरुप दुसऱ्या क्रमाकांची वाढ असून अहमदनगर जिल्ह्यातील वनक्षेत्रात १२ चौ.किमीची वाढ झाली आहे. तर कांदळवन क्षेत्रातील वाढीमध्ये रायगड किनारी जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे. या जिल्ह्यातील कांदळवनामध्ये ६.०२ चौ.किमीची वाढ झाली आहे. ( konkan forest )



अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121