शाब्बाश इंडिया! : १५९ कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण

    19-Jan-2022
Total Views | 83

Vaccination
 
 
 
नवी दिल्ली : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. सुमारे ९२ लाख लोकांना पहिली तर ६६ लाख ६२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा मिळाली आहे. ५६ लाख ५५ हजारांहून अधिक जणांची वर्धक मात्रा घेऊन झाली आहे.
 
 
१५ ते १८ वयोगटातल्या पावणे चार कोटी मुलामुलींनी कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली आहे. 'काल दिवसभरात ७६ लाख ३५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात आली.', असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
 
 
देशभरात काल कोविडचे २ लाख ८२ हजार नवे रुग्ण आढळले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाख ३१ हजार झाली आहे. काल दिवसभरात एक लाख ८८ हजार रुग्ण कोविडमधून बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णाक ८८ शतांश झाला आहे. आतापर्यंत साडे ३ कोटींहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण ८ हजार ९६१ रुग्ण देशात आढळले असून आतापर्यंत ७० कोटी ७४ लाख कोविड चाचण्या झाल्या आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121