तेल उत्खननामध्येही ‘आत्मनिर्भरता’ शक्य!

‘एमईआयएल’च्या नव्या स्वदेशी तंत्रज्ञानांमुळे सुरक्षित, वेगवान तेल उत्खननासाठी होणार मदत

    28-Aug-2021
Total Views | 197
TEL 123_1  H x
 
   
‘एमईआयएल’च्या नव्या स्वदेशी तंत्रज्ञानांमुळे सुरक्षित, वेगवान तेल उत्खननासाठी होणार मदत
 
 
मुंबई : ‘मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ने (एमईआयएल) स्वदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ’ऑईल ड्रिलिंग रिग’ नुकतीच ’ओएनजीसी’कडे सुपूर्द केली. या नव्या ‘ड्रिलिंग रिग’मुळे ऑईल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच, शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चातही बचत होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप मर्यादित झाल्याने तेल उत्खनन सुरक्षित आहे, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ (एमईआयएल) उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणाले, “ ‘मेक इन इंडिया’ आणि ’आत्मनिर्भर भारत’ या योजना यशस्वी करायच्या असतील, तर इंधन आयातीचे प्रमाण कमी झाले पाहिजे. ‘एमईआयएल’ने या क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला आहे. देशांतर्गत तेल उत्पादनात वाढ आणि देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी परकीय चलनात बचत यात महत्त्वाची भूमिका वठवताना आम्हाला अभिमान वाटतो.”
 
 
‘एमईआयएल’चे मुख्य अधिकारी (तेल उत्पादन रिग्ज डिव्हिजन) एन. कृष्णकुमारयांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, आतापर्यत भारत तेल उत्पादन करणार्‍या रिग आयात करत होता, परंतु एमईआयएलने देशार्तग रिग बनवण्याची क्षमता वाढवत तेल आणि गॅस उत्पादन रिग स्वस्त, सोपे आणि सुरक्षित बनवल्या आहेत. हे तंत्रज्ञान आता तेल आणि गॅस उत्खनन अधिक वेगवान बनवते.ओएनजीसीकडे सुपुर्द करण्यात आलेली दूसरी रिग हाइड्रोलिक आणि सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करते. तिची क्षमता पंधराशे हॉर्स पॉवर इतकी आहे. याचा फायदा ओएनजीसीलाच होईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही रिग ओएनजीसी अहमदाबादातल्या कलोलजवळ धमासना गावात ‘सीजीएस’ खत तेल क्षेत्रात कार्यरत होणार आहे.
 
 
ही ड्रिलिंग रिग जमीनीखाली चार किलोमीटरपर्यंत खोदकाम करु शकते, तसेच 40 वर्षांपर्यंत सुस्थितित कार्यरत असू शकते. गरजेप्रमाणे दुसरीकडे स्थलांतरितही करता येऊ शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सुरक्षा मानकाची पुर्तता करणारी ही रिग निश्चितच भारताच्या भविष्यकालिन गरजा पुर्ण करणारी आहे. एमईआयएलला 2019मध्ये ओएनजीसीतर्फे अशा 47 ड्रिलिंग रिग बनवुन देण्याची ऑर्डर मिळाली आणि पुढच्या 35 महिन्यांच्या आसपास या सर्व रिग ओएनजीला पुरवण्यात येतील.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121