गोखले इन्स्टिट्यूटमार्फत एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ‘ओशन’ या प्रकल्पाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात येत आहे. (Ocean Oil Collection)
Read More
सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छतेची कमतरता, तसेच उपलब्ध शौचालये आणि लोकसंख्येचे व्यस्त प्रमाण यामुळे धारावीकर ई-कोलाई या गंभीर विषाणूच्या संसर्गाच्या सावटाखाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बहुतांशी वस्तीतील अस्वच्छ शौचकुपे (टॉयलेट सीट), पाण्याची कमतरता, स्वच्छतेसाठी साबण किंवा इतर बाबींचा अभाव यामुळे ई- कोलाई विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून स्थानिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अतिसार (डायरिया) समजून स्थानिकांकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या या विषाणू संसर्गाने धारावीत पोटाच्या विकारां
अमेरिकेने भारतावर अवाजवी कर लादला असून आमच्या राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे प्रत्युत्तर भारताने अमेरिकेस दिले आहे.
भारताची ऊर्जा गरज ही प्रचंड असून, त्यापैकी सुमारे 85 टक्के गरज ही आयातीतून भागवली जाते. परिणामी, आंतरराष्ट्रीय दरवाढ, डॉलरवरील अवलंबित्व आणि व्यापार तफावत या तिन्ही संकटांचा सामना भारताला करावा लागतो. यावर स्वदेशी पर्यायांचा शोध हा अत्यावश्यक असाच.
भारतीय तेल शुद्धिकरण कंपन्या रशियन पुरवठादारांकडून क्रूड तेल खरेदी करत असून, या खरेदीचे निर्णय फक्त किंमत, क्रूडचा दर्जा, साठा, वाहतूक व्यवस्था आणि इतर आर्थिक घटक लक्षात घेऊन घेतले जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दि. १ ऑगस्ट २०२५पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ३ रुपये प्रति किलो लिटर सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास डिझेल खरेदीवर एकूण तीन रुपये प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार आहे,अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपारिक ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती अनोख्या पद्धतीने जगासमोर आणणाऱ्या शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस, लहान मुलगी, आईवडील आणि बहिण असा परिवार आहे. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीत प्रकल्प उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
‘जग बदल घालुनी घाव...’ असं म्हणणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक, लेखक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वार्थाने भाषेच्या, राष्ट्राच्या सीमा ओलांडून अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या ज्वलंत लेखणीमुळे परिवर्तनाचा वेगळा विचार मराठी मातीमध्ये पेरला गेला. काल त्यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या याच साहित्यविश्वाचा घेतलेला धांडोळा...
येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर ३० पैशाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी ३ लाख २३ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे ११ कोटी ८० लाख रुपये इतकी बचत होणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून अलीकडेच त्याला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून ‘माझी माती, माझा बाप्पा’ या नावाने एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रदर्शन दालनात ही कार्यशाळा पार पडणार आहे.
पश्चिम दृतगती महामार्गांवर शौचालयांची सुविधा नाही. मुंबईहून दहिसर, विरारला जाण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. याचा आढावा घेऊन पश्चिम दृतगती महामार्गांवर ज्या जागा आहेत तिथे शौचालयांची सुविधा प्रवाशांसाठी करणार का? अशी विचारणा आज सभागृहात बोलताना आ. दरेकर यांनी शासनाला केली.
राजधानी दिल्लीतील वसंत विहार परिसरात ९ जुलै रोजी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. शिवा कॅम्पजवळ फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना एका भरधाव पांढऱ्या ऑडी कारने चिरडले. या अपघातात आठ वर्षांच्या मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इस्रायल-इराण युद्धामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी इराणद्वारे बंद होण्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. पुढे इराणच्या संसदेने यावर मतदान घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या दिशेने एक पाऊलही टाकले. होर्मुझची सामुद्रधुनी निश्चितच कच्च्या तेलाच्या पुरवठा मार्गातील एक प्रमुख मार्ग आहे. मात्र, तो बंद झाल्यास भारतावर होणार्या परिणामाचे जे चित्र रंगवण्यात आले होते, ते अनाठायी होते. भारत अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम होता आणि आहे. त्यानिमित्ताने भारताच्या तयारीचा घेतलेला हा आढावा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेच्या पुढाकारातून गेली १० वर्षे निर्मलवारी अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये एकूण ३६०० फिरती शौचालये वापरली जात असून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये अतिरिक्त दोन हजार शौचालये बसवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाने २६ हजार सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. निर्मलवारी उपक्रमामुळे पालखी मार्गावरील गावांमधील घाणीत ८० टक्के घट झाली आहे.
Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत
विशेष प्रतिनिधी पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा जगातील सर्वात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या योजनेदरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्र सरकार इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मध्य-पूर्वेसह जागतिक चिंतेत भर घालणार्या इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकाही उडी घेते का, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमेरिकेने या संघर्षात इराणविरोधात इस्रायलची साथ दिल्यास हे युद्ध ‘टी ट्वेंटी’प्रमाणे वेगवान पण, छोटेखानी ठरेल, अन्यथा त्याचे रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणे कसोटी सामन्यांत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
शनिवार दि. १४ जून रोजी इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रातील फेज 14 वरील प्रमुख प्रक्रिया युनिटवर हवाई हल्ला केला. यामुळे 12 दशलक्ष घनमीटर गॅस उत्पादन अंशतः थांबवावे लागले. हा हल्ला इराणच्या तेल आणि वायू पायाभूत सुविधांवर इस्रायलचा पहिला थेट हल्ला होता, जो क्षेत्रीय तणावात वाढ आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील अस्थिरता दर्शवतो.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २५ येथील शौचालयाचे आणि ओम गगनगिरी सोसायटीच्या सभामंडपाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आणि भाजपा सहसंयोजिका निशा परुळेकर यांच्या पुढाकाराने नुकतेच पार पडले.
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑईल खरेदी करून त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न ‘ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क’(ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात होत आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या प्रकल्पाविषयी...
खाद्यतेल हा प्रत्येक स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे. जरी आपल्याला वाटत असेल की, प्रत्येक खाद्यतेल विकत घेणे हे निरोगी जीवनासाठी बंधनकारक आहे पण हे सत्य फारसे चुकीचे आहे. तज्ञांच्या मते वारंवार हे सिद्ध झाले की अशी अनेक खाद्यतेल आहेत जी मानवाच्या हृदयासाठी चांगली नाहीत त्यांना वापरापासून टाळयला पाहिजे. या तेलांमध्ये कृत्रिम ट्रान्स फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ती कोलेस्ट्रॉल वाढवणारी ठरतात यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे
( Womens groups to manage womens toilets on highways minister aditi tatkare ) चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक 25 किमी अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय, महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, द
मुंबईसह राज्यातील महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावी यासह हॉटेल्स ढाबे आणि पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी बुधवार, १९ मार्च रोजी विधानपरिषदेत केली.
जागतिक पातळीवर असलेली वाढती अनिश्चितता तसेच, ट्रम्प यांच्या धोरणांचा तडाखा यामुळे जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता अधिक. या अस्थिर वातावरणात विदेशी संस्थागत गुंतवणूकदार देशातून गुंतवणूक काढून घेत असले, तरी येणार्या काळात भारताची वाढ पुन्हा एकदा वेगाने होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
सौदीअरबमध्ये ( Saudi Arebia ) असलेल्या तेल संपत्तीमुळे, या देशाचे जागतिक राजकारणात महत्त्व आहे. मात्र, इंधन म्हणून तेल वापरण्याऐवजी, इतर पर्याय आता जगभरात शोधले जात आहेत. काही वर्षांनी तेल इंधनाला नवीन पर्यायही उपलब्ध होतील. तसेच कधी ना कधीतरी, सौदीचा तेलसाठाही संपेल. त्यामुळे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी, तेलसाठ्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी आर्थिक संपन्नता साधण्याचे मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, मक्का-मदिनामध्ये सर्वधर्मीय विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकतील. मात्र, गुंतवणूक
मुंबई मेट्रो ७ आणि २ए मार्गावरील ३० मेट्रो स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता पुरवण्याकरीता मुंबई मेट्रोने ‘टॉयलेट सेवा ॲप’ यांच्या सहकार्याने स्वच्छ्ता उपक्रम राबवला आहे. या ॲपद्वारे मेट्रो स्टेशनवरील ‘टॉयलेट’ची संपूर्ण माहिती प्रवाशांना तात्काळ मिळू शकणार आहे.
भारताने जागतिक निर्बंधांचा विचार न करता रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील प्रचंड दरवाढ रोखली गेली, हे अधोरेखित झाले आहे. भारताने सवलतीच्या दरातील तेल खरेदी करताना विदेशी चलनाची बचत तर केलीच, त्याशिवाय पुरवठादार देशांमध्ये वैविध्य आणत अवलंबित्व कमी केले.
इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावानंतर जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होणार असून इराणच्या हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तेल विपणन, पेंट्स, एव्हिएशन आणि टायर यासारख्या प्रमुख तेल संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.
भविष्यात चीन भारताला हतबल करण्यासाठी तेल साखळी विस्कळीत करू शकतो. भारत तेलाची ८२.८ टक्के आयात सागरीमार्गे करतो आणि चीन भारताशेजारी ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स‘च्या माध्यमातून भारताला भारताच्या क्षेत्रात गुंतवण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळे भारताने येणार्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे.
जुलै महिन्यात भारताने रशियाकडून विक्रमी 2.09 दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी तेलआयात केली. भारताने पारंपरिक तेलपुरवठादार देशांना म्हणजेच आखाती देशांना मागे सारत, रशिया भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार देश म्हणून आता पुढे आला आहे. मध्य- पूर्वेतील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या विषयाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित व्हावे.
सरकारने पेट्रोलियम व कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर (Windfall Tax) मध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे. सरकारने शुक्रवारी या संदर्भात आपले निवेदन स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की करात कपात करत ५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
जागतिक पातळीवर ओपेक राष्ट्रांनी बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे ठरवले असले तरी युएस गॅसोलिनचा मुबलक साठा, मागणीत घट यामुळे बाजारात काही काळ तेलाच्या दरात कपात झाली असली तरी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. दुसरीकडे EIA दिलेल्या अहवालात तेलाचा साठा अनपेक्षितरित्या वाढल्याचे सांगि तले होते मात्र तज्ञांच्या मते हा आकडा पुरेसा नसून मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाली आहे.परिणामी बाजा रात कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने लोकल रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने भायखळा स्थानकावर फलाट क्रमांक १ वर नवीन स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. भायखळा येथील अमृत स्थानक योजनेअंतर्गत पुरुषांसाठी ०२ शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी ०१ प्रसाधनगृह आणि महिलांसाठी १ , महिला दिव्यांगांसाठी ०१ स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत अजून २ शौचालयाचा स्थानकावर समावेश आहे. एक फलाट नंबर १ वर (कल्याण च्या शेवटी) आणि दुसरा प्लेटफॉर्म नंबर ४ वर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या शेवटी) जवळपास तयार आहेत. हे स्वछतागृहे देखील
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घट झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीतील उत्पादन कपात पुढे ढकलला गेल्याच्या निर्णयानंतर बाजारात क्रूड तेलाच्या दरात स्थिरता आली आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षातील सर्वाधिक घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.
जूनमध्ये होणारी ओपेकची बैठक लक्षात घेता क्रूड (कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारातील कच्च्या तेलाच्या उत्पादन व पुरवण्यात घसरण होत असताना तेलाचे भाव अधिक महाग होऊ शकतात. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारताच्या सर्वात मोठ्या रिफायनरी कॉम्प्लेक्सने रशिया सोबत 'डील' केलेले आहे.
जागतिक पातळीवरील ओपेक (Organisation of the Petroleum Exporting Countries and its allies) राष्ट्रांची बैठक २ जूनपर्यंत होण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. आगामी काळात तेल उत्पादनात कपात करावी की नाही यावर या बैठकीत मंथन होण्याची शक्यता असल्याने यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
काही महत्वाच्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मुख्यतः मध्य आशियातील इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर मध्यपूर्वेतील दबाव कायम दिसून येत आहे.तसेच आगामी १ जूनला ओपेक (OPEC) राष्ट्रांची बैठक होणार असून कच्च्या तेलाच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्यासाठी आणखी काही दिवस महागाई दर नियंत्रणात आल्यास होणार असल्याचे युएस कडून सुतोवाच मिळाल्याने बाजारात यांची दखल घेतली गेली.
मध्य आशियातील काही घडामोडींमुळे व इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या मृत्यूमुळे बाजारातील क्रूड तेलाची हालचाल थंडावली आहे. तसेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांच्या नव्या विधानामुळे बाजारात क्रूड (कच्च्या) तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरण झाली आहे.
केरळमधील कोल्लममध्ये आशिक बद्रुद्दीन नावाच्या स्थानिक काँग्रेस युवा नेत्याला बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून महिलांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांनी काँग्रेसचा युवा नेता आशिक बद्रुद्दीन यांच्याविरोधात थिनमला येथे शौचालय ऑपरेटर म्हणून काम करत असताना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
कालपासून अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण होत मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये क्रूड तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ( कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार असल्याने बाजारातील क्रूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अमेरिकन बाजारातील आकडेवारीनुसार ' क्रूड ' (कच्च्या) तेलाच्या साठा मुबलक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कालपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती मात्र आज क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने बाजारात तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
अक्षयतृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने त्यांचे परिणाम भारतीय बाजारात झाले आहेत. कालपासून स्वस्त झालेले सोन्याचे भाव दुपारनंतर पुन्हा वधारले आहेत.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.६४ टक्क्यांनी वाढ झाली असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७१११९.०० पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकातही १.५४ टक्क्यांनी वाढ झाल्याने चा
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आज सरकारने व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. १ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय फेडची बैठक आज समाप्त होणार असून याविषयी जेरोम पॉवेल आपला फेडरल रिझर्व्ह व्याजदराचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये व्याजदरत बदल झाला का नाही झाला याबाबत कळेल परंतु त्याआधी रोजगार निर्मितीची अपेक्षित आकडेवारी अमेरिकेत आली नाही.व्याजदर घोषित करण्याच्या पूर्वसंध्येला बाजारात एक काळजीवाहू काळ सुरू झाल्याने बाजारात क्रूड तेलाच्या आंतरराष्ट्रीय मागणीत घट झाली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मंगळवारी आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ४९.९६ टक्यांच्या निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा ५१४८.८७ कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीला १०२८९.८२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात यंदा घट झाली आहे.
जागतिक मंदीची साशंकता असतानाही आज क्रूड तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कपात झाली आहे. घटलेली मागणी, युद्धजन्य परिस्थितीत शांतता निर्माण झाल्याने व लवकर युएस व्याजदरात कपातीची शक्यता धूसर झाल्याने काही प्रमाणात बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत स्थैर्य प्राप्त झाले आहे.
काल ओपेक सदस्य देशांनी तेलाच्या उत्पादनात घट करायचे ठरवल्यानंतर रशियानेही तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले होते. युक्रेनने रशियन कच्च्या तेलाच्या (क्रूड) खाणीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याने रशियाने तेलाचे आऊटपूट कमी करण्याचे ठरवले होते. तेलाच्या वाढत्या मागणीमुळे व तेलाचे उत्पादन कमी झाल्याने एकूण बाजारात तेलाचा तुटवडा होता.परंतु दुसरीकडे डॉललचे मूल्यांकन कमी झाल्याने क्रूड तेलाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.