भारतात आतापर्यंत ३८ कोटींपेक्षा जास्त लसीकरण

    12-Jul-2021
Total Views |



modi_1  H x W:




नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेची पूर्वसूचना आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75 % लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवणार आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 38.86 कोटींपेक्षा जास्त (38,86,09,790) लसींच्या मात्रा राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी 63,84,230 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.


आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार, वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 37,31,88,834 मात्रा देण्यात आल्या आहेत.


याशिवाय लसीच्या 1.54 कोटी पेक्षा जास्त, शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा (1,54,20,956) राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.