पेटते बंगाल (भाग ६); महिला वकिलास बलात्काराच्या धमक्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2021   
Total Views |
tmc_1  H x W: 0



पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. कोलकाता उच्च न्यायालयातील वकील परामिता डे यांच्या घरावर ७० जणांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर घटना आजच्या सहाव्या भागात जाणून घेणार आहोत.
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या ६० ते ७० गुंडांनी माझ्या घरावर हल्ला केला. त्यानंतर मला बलात्काराच्या धमक्या येण्यास सुरुवात झाली. त्याची तक्रार केली असता पोलिसांनी कोणताही कारवाई केली नाही”, कोलकाता उच्च न्यायालयातील वकील अॅड. परामिता डे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे आपला जबाब नोंदविताना म्हटले आहे.
 
 
 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले आहे. भाजप कार्यकर्ता अथवा समर्थक असलेल्या महिलांवर हल्ले करणे, त्यांना बलात्काराच्या धमक्या देणे असे प्रकार घडत आहेत. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प. बंगालमध्ये गेले होते. पथकाने पिडीत महिलांची भेट घेऊन त्यांचे जबाब नोंदविले. त्यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयातील वकील अॅड. परामिता डे यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. डे या कॅनिंग पश्चिम (उमरा) या मतदारसंघातील रहिवासी आहेत.
 
 
 
त्या म्हणाल्या, “निवडणुकीच्या निकाल जाहिर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हमजे ३ मे रोजी माझ्या घरावर तृणमूल काँग्रेसच्या ६० ते ७० गुडांनी हल्ला केला. त्यात माझे कार्यालही पूर्णपणे उध्वस्त झाले. त्याच्यानंतर मला फोनवरून आणि समाजमाध्यमांवरून अनोळखी व्यक्तींकडून बलात्काराच्या धमक्या येण्यास सुरुवात झाली. या सर्व प्रकाराची पोलिस तक्रारही केली. मात्र, त्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यानंतर काही व्यक्ती २४ तास माझ्या घराजवळ घुटमळत असल्याचा आणि माझ्यावर सतत नजर ठेवण्याचाही प्रकार घडत असून मद्यपींकडून मला दररोज शिवीगाळ केली जाते”.
 
 
 
अॅड. परामिता डे या ‘सिंगल मदर’ असून आपल्या मुलासोबत राहतात. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी त्यांनी अन्य सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याने त्या बचावल्या. अन्यथा हल्लेखोरांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावरही हल्ला केला असता. तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात त्यांच्या घराचे आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे सध्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरता आश्रय घ्यावा लागत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@