पेटते बंगाल (भाग ३); १८ गावांमध्ये १८ कार्यकर्त्यांच्या हत्या; कारवाई अद्यापही नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2021   
Total Views |
violence_1  H x



पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अभाविप कार्यकर्त्यांच्या हत्या करणे, त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले करणे, भाजपसमर्थक अनुसूचित जाती आणि जमातींच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, महिलांवर बलात्कार करणे असे प्रकार सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी आपल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे स्वप्न पाहण्यास मश्गूल आहेत. मात्र, बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या तिसऱ्या भागात भाजपच्या १८ कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या आणि राज्यातील परिस्थिती जाणून घेणार आहोत.
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या तबब्ल १९ कार्यकर्त्यांच्या हत्या घडविण्यात आल्या. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने अतिशय नियोजनबद्ध रितीने या हत्या घडविल्याचा आरोप भाजपने केला आहे. स्वतंत्र भारतात राजकीय कारणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्या होणे हे प्रथमच घडले आहे. तरीदेखील प. बंगाल सरकार आणि प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
 
 
 
भाजपचे जगदल विधानसभा मतदारसंघातील एका बुथचे प्रमुख कमल मोंडल हे तृणमूल कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर अनेक दिवसांपासून होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला, कमल यांना वाचविण्यासाठी त्यांची आई शोवा मोंडल यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि त्यातच ८५ वर्षीय शोवा मोंडल यांचा मृत्यू झाला.
 
 
 
राणाघाट येथील गंगापूर येथे उत्तम घोष हे भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे काम करीत होते. निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाल्यापासूनच त्यांना मारहाणीच्या आणि भाजपचे काम थांबविण्याच्या धमक्या आल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे २ मे त्या मध्यरात्रीच उत्तम घोष यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे बेलेघाटा येथे अभिजीत सरकार, सोनारपूर येथील हरन अधिकारी, बोलपूर येथ गौरब सरकार, सितलकुची येथील मिंटू बर्मन, दिनहाटामध्ये हरधन रॉय आणि चंदन रॉय, इंदूस येथील अनुप रुईदास, केतुग्राममधील बलराम माझी, सबंगमध्ये बिस्वजित महेश, झारग्राम येथे किशोर मांडी, नइहाटीमध्ये संतु मंडल, मोतिहारीमधील मनोज मोंडल आणि चैतन्य मोंडल, सोनामुखमध्ये कुश क्षेत्रपाल, संदेशखल्लीमधील आस्तिक दास आणि नंदीग्राममध्ये देबब्रत मैती अशा एकुण १८ कार्यकर्त्यांच्या हत्या २ मे ते आजतागायत झालेल्या आहेत.
 
 
 
 
नियोजनबद्ध रितीने पक्षाची फळी संपविण्याचा प्रकार
 
 
 
प. बंगालमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर जनाधार प्राप्त झाल्याचे आता सिद्ध झाले आहे. भाजपने ३ वरून ७७ आकडा गाठला आहे, त्यातील वैशिष्ट्य म्हणजे अनुसूचित जातींसाठी राखीव ६८ जागांपैकी ३४ तर अनुसूचित जमातींसाठी राखीव १६ जागांपैकी ९ जागांवर भाजपला यश मिळाले आहे. भाजपच्या या विस्तारणाऱ्या जनाधारामागे भाजपच्या पन्नाप्रमुख, बुथप्रमुख या अगदी तळाच्या कार्यकर्त्यांचे महत्वाचे योगदान आहे. आतापर्यंत झालेल्या १८ हत्यांमध्ये याच कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामागे भाजपला समाजाच्या शेवटच्या थरात जाऊन काम करणारे कार्यकर्ते मिळू न देणे, सध्या कार्यरत कार्यकर्त्यांच्या मनात दहशत निर्माण करणे आणि पक्षाचे संघटन पूर्णपणे कमकुवत करणे असा प्रकार असल्याचे दिसते.
 
 
 
पोलिस आणि प्रशासनावर तृणमूलचा दबाव ?
 
 
 
“प. बंगालमध्ये हिंसेचा सामना करणारे नागरिक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास घाबरत आहेत तर पोलिसांवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे”. असे स्पष्ट विधान राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केले आहे. राज्यात २ मे नंतर झालेल्या हिंसाचाराचा अहवाल राज्यपालांकडे सादर करण्यातही राज्याच्या मुख्य सचिवांनी विलंब लावला होता. त्यामुळे बंगालमध्ये प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या पूर्णपणे प्रभावात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@