'महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार'

    02-Mar-2021
Total Views |

central government_1 


मुंबई :
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. यानंतर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली त्याला सर्वात जास्त कारणीभूत असेल तर ते केंद्रातील मोदी सरकार आहे, असा आरोप केंद्र सरकारवर केला.


नाना पटोले म्हणाले, "मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये WHO ने केंद्रातील मोदी सरकारला अलर्ट केलं की, कोविड आपल्या देशात येईल त्याबाबत सुरक्षा आपण केली पाहिजे. मात्र त्यावेळी मोदी सरकारने लक्ष दिले नाही.आज देशात कोविडची परिस्थिती वाईट झाली. यामुळे एक वर्षात देशातील आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती बिघडली. महाराष्ट्र सरकार कोविडच्या कालावधीमध्ये ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. पण केंद्राने महाराष्ट्र सरकारवर उलटा आरोप लावला असल्याचे नाना पटोले म्हणाले.
.