मुंबईः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २१ फेब्रुवारी रोजी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत दुसरे लाट आली की नाही हे कळण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागेल असे म्हंटले आहे. राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती पुन्हा गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.लॉकडाऊनवर मुख्यमंत्र्यांनी भर देणं सध्या तरी टाळलं मात्र आठ दिवसांनी परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लसीकरण करुन घ्या, बेधडक करुन घ्या
दरम्यान उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले,कोरोना महाराष्ट्रात येऊन आता वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. ह्या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हे असं असायला भाग्य लागतं. दिलासादायक चित्रानंतर आता पुन्हा कोरोना राज्यात हळूहळू हायपाय पसरायला लागला. मात्र आता दिलासादायक एवढच की आता वॅक्सिन आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली गेली आहे. मात्र या योध्यांमध्ये रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का अशी भीती आहे. पण ज्या ९ लाख लोकांना लस दिली त्यांच्यात घातक असे साईड इफेक्ट नाहीत. कोरोना योद्ध्यांना सांगतोय, लसीकरण करुन घ्या, बेधडक करुन घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.पुढे ते म्हणाले, आता तुम्ही म्हणाल आमचं लसीकरण कधी तर उपरवाले की मेहरबानी. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील. तोपर्यंत काय काय करायचं.तर समजुतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम
मी नेहमी शिवनेरीवर जातो. पण यावेळेस मुख्यमंत्री म्हणून गेलो. मी तिथही सांगितलं, शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन राऊत यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी
संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय समजुतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय असल्याचे सांगत असतानाच उद्धव ठाकरे यांनी कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती असलयाचे नमूद केले. राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या राज्यात ५३ हजार सक्रिय रुग्ण, अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पुन्हा एकदा आपल्याला बंधन पाळावी लागणार आहे. मुंबईमध्ये रुग्ण डबल झालेत, कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारतेय.त्यामुळे आता मी जबाबदार अशी नवी मोहीम राबवायची आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नंतर आता मी जबाबदार अशी नवी मोहीम. आता ऑफिसच्या वेळेची पद्धत बदलावी लागेल. वर्क फ्रॉम होम केलं तर गर्दी टळेल. सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी. उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी, पक्ष वाढवू, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू. शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश, तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल.पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, अचानक लॉकडाऊन घोषीत करु नका. जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.