मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 247 कोटींचे हेरॉईन जप्त,

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2021   
Total Views |
 
Mumbai-Air-Port-_1 &
 
 
 
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स यूनिटने (AIU) मोठी कारवाई केली . विमानतळावर आलेल्या दोन परदेशी नागरिकांकडून तब्बल 247 कोटींचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त करण्यात आले. संबंधित आरोपींकडे तब्बल 35 किलो हेरॉईन सापडल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी एआययूने दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. विमानतळावर दोन व्यक्ती अशाप्रकारे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची गुपित माहिती डीआरआयला (DRI) सूत्रांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातील ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वात मोठी कारवाई आहे. दोन परदेशी नागरिकांना ड्रग्जची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. याप्रकरणी हेरॉईनच्या चार बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
 
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रग्जची साठा काहींना पुरविण्यासाठी मुंबईत आले होते. अटक करण्यात आलेले ड्रग्ज तस्कर हे झिम्बाब्वेचे नागरीक आहेत. ते पार्टीसाठी ड्रग्जचा सप्लाय करण्यासाठी आले होते. अटक केलेल्यांमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 
 
 
नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून विमानतळावरुन चार कोटींचे हेरॉईन जप्त
विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही पहिलीच कारवाई नाही. ईनीसीने गेल्या महिन्यात 4 नोव्हेंबरला अशीच एक कारवाई केली होती. एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गोकॉम्प्लक्स येथून 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत तब्बल 4 कोटी इतकी होती. याप्रकरणी एनसीबीने कृष्ण मुरारी प्रसाद नावाच्या इसमाला अटक केली होती.
 
 
 
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 नोव्हेंबरला 20 कोटींचे हेरॉईन जप्त
विशेष म्हणजे त्यानंतरही कस्टम विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई 24 नोव्हेंबरला करण्यात आली होती. कस्टम विभागाने 4 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत तब्बल 20 कोटी रुपये इतकी होती. याप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली होती.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@