'आरे'तील रस्तेकामाला सुरुवात ; महापालिकेकडून ४७ कोटींचा निधी मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2021   
Total Views |
 
Aarey-tree roads_1 &
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रासह मुंबई महानगरातील शहरांना ऑक्सिजन पूरविणाऱ्या 'आरे' वनक्षेत्रात रस्तेकाम करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरेतील या सर्व कामांना महापालिका प्रशासनातर्फे मंजुरी देण्यात आली असून त्या करिता स्थायी समितीने अंदाजे ४७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी महापालिका प्रशासनातर्फे या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली.
 
 
 
मुंबईतील आरे परिसर आणि त्या ठिकाणी होणाऱ्या या सर्व विकासकामांना मात्र काही पर्यावरण वाद्यांनी मागील अनेक दिवसांपासून विरोध करायला सुरुवात केली आहे. "शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शहरात विकास हा व्हायलाच हवा, मात्र निसर्ग आणि आरेतील वनसंपदेला या कामांमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी आम्हाला भीती आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले रस्ते उखडून त्या ठिकाणी नवे रस्ते बांधण्यात आले होते आणि आता काही वर्षांनंतर लगेचच त्या ठिकाणी नवीन रस्ते बांधणीचे प्रयोजन करण्यात आले आहे. या कामाद्वारे पर्यावरण आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारे खेळ होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे," अशी भूमिका काही पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
 
 
 
हे तर निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्याचे उद्योग : दयानंद स्टॅलिन यांचा आरोप
"महापालिका प्रशासनातर्फे आरेतील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ४७ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी की रस्त्यांच्या निधीखाली देण्यात येणारा हा पैसा केवळ आणि केवळ येत्या महापालिका निवडणुकांमध्ये खर्च करण्यासाठी गोळा करण्यात येत आहे. या खर्चाच्या आडून अनेक गोष्टी
सुरु आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हा अत्यंत निराशाजनक आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन्स टाकण्यात येत आहेत मात्र त्या कामातही अनेक अनियमितता आहेत" असा आरोप वनशक्ती संस्थेचे संचालक दयानंद स्टॅलिन यांनी केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@