बीडीडी चाळ स्फोटातील तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू

वरळीच्या कामगार वसाहतीतील बीडीडी चाळ परिसरात झालेल्या स्फोटातील तिसऱ्या रुग्ण विद्या पुरी (वय २५ वर्षे) यांचा सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.

    06-Dec-2021   
Total Views | 133

 
bdd blast_1  H

 
 
 
मुंबई : वरळीच्या कामगार वसाहतीतील बीडीडी चाळ परिसरात झालेल्या स्फोटातील तिसऱ्या रुग्ण विद्या पुरी (वय २५ वर्षे) यांचा सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर हर्षद कस्तुरबा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. मंगळवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी वरळीतील बीडीडी चाळ परिसरातील इमारतीत एका घरात झालेल्या स्फोटात एकूण चार जण जखमी झाले होते. ज्यामध्ये आनंद पुरी, मंगेश पुरी, विद्या पुरी आणि विष्णू पुरी यांचा समावेश होता.
 
 
यापैकी मंगेश पुरी या अवघ्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा नायर रुग्णालयात भरती केल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयात सुमारे ४५ मिनिटे कुठलेही उपचार जखमींना देण्यात आले नव्हते. दरम्यान, जखमींपैकी आनंद पुरी (२७ वर्षे) यांना शनिवार, दि. ४ डिसेंबर रोजी मृत घोषित करण्यात आले होते. तर विद्या पुरी यांना सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी मृत घोषित करण्यात आले आहे. या स्फोटात जखमी झालेल्या विष्णू पुरी या चौथ्या रुग्णाची स्थिती सध्या स्थिर असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121