प्रभाग क्र. १४ मध्ये मोफत कांबळ वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2021   
Total Views |
 
seema shinde bjp_1
 
 
 
 
मुंबई : मुंबई भाजपच्या नेत्या आणि एम फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. सीमा शिंदे यांच्या वतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत कांबळ वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ऍड. सीमा शिंदे यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे विभागात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपली उपस्थिती दर्शवली. 
 
 
या कार्यक्रमाला उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाल शेट्टी, उत्तर मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, प्रभाग क्र. १४च्या विद्यमान नगरसेविका आसावरी पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@