ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची नियमावली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2021   
Total Views |
 
omicron_1  H x
 
 
 
मुंबई : टांझानियातून आलेल्या धारावीतील नागरिकाला झालेल्या ओमिक्रॅानच्या बाधेमुळे धारावीत ओमायक्रॉनचा चंचुप्रवेश केला होता आणि त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन हाय अलर्टवर गेले होते. या पार्श्वभूमीवर धारावीत आता कोविड विरोधात नियमांची त्रिसुत्री लागू करण्यात येणार असून या द्वारे कोरोना चाचण्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जुंतूकीकरण यावर महापालिका भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात 'माझी आस्थापना सुरक्षीत आस्थापना’ मोहीमे अंतर्गत धारावीतील कारखान्यांमधील कामागारांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याचबरोबर रहिवाशांच्या लसीकरणासाठीही विशेष मोहीम राबविणार आहे. धारावी परिसरात कोरोना आकडेवारी पूर्णपणे नियंत्रणात आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या सातच आहे. तर, तुरळक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. असे असले तरी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आमच्या वतीने कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे," असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@