मुंबईत २७९ कोरोनाबाधितांची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात २७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७३६५८४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी मुंबईत केवळ एका कोरोनाबाधितांचा रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २७८० इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २२४४ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. शहरातील एकूण १३ इमारती पालिका प्रशासनातर्फे सीलबंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@