मुंबई विमानतळावर चार कोटींचे अमली पदार्थ जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2021   
Total Views |
 
ncb_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : २ ऑक्टोबर मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या मुंबई एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली असून तो पदार्थ हेरॉईन असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदार्थाची अंदाजे रक्कम ४ कोटी रुपये आहे. याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे, असे एनसीबीतर्फे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.
 
 
 
एनसीबीने याप्रकरणी एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हे पार्सल गुजरातमधील वडोदरा येथील कृष्णमुरारी प्रसाद याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एनसीबी याबाबत पुढील चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले
@@AUTHORINFO_V1@@