महापालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींचा खर्च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2021   
Total Views |
 
bmc_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या भव्यदिव्य मुख्यालयाची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या कामासाठी तब्बल दहा ते पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काही दिवसांत महापालिका मुख्यालयाच्या वास्तुचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते आणि त्यानंतर निघालेल्या निष्कर्षाअंती मुख्यालय दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामात मुख्यालय इमारतीच्या छताची दुरुस्ती केली जाईल. असे सांगण्यात आले आहे.
 
 
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जवळपास १० वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीबाबत काही कामे करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर इमारतीची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले होते. ही जुनी इमारत असल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागते. इमारत दुरुस्तीचा हा पाचवा टप्पा असून त्या करिता सुमारे 10-15 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे,' अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@