'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचे दर्शन; कॅमेऱ्यात छायाचित्र कैद

    28-Nov-2021   
Total Views | 1517
tillari _1  H x



मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचे ( sahyadri tiger ) छायाचित्र टिपण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. वाघाने शिकार केलेल्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये त्याचे छायाचित्र कैद झाले आहे. नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाच्या ( sahyadri tiger ) पावलांचे ठसे आणि त्याने केली शिकार आढळून आली होती. ( sahyadri tiger )

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात २९.५३ चौ.किमी राखीव वनक्षेत्राचा समावेश 'तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' तयार करण्यात आले आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रूक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्रांचा समावेश आहे. गोवा आणि कनार्टकच्या सीमावर्ती भागात हा परिसर वसल्यामुळे वन्यजीव जैवविविधतेच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध आहे. खास करुन गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्यामधून येणारा व्याघ्र भ्रमणमार्ग या परिसराला येऊन मिळतो. त्यामुळे तिलारीच्या खोऱ्यात पट्टेरी वाघांचे ( sahyadri tiger ) प्रजनन होते. त्यामुळे याठिकाणी वाघांचा ( sahyadri tiger ) कायमस्वरुपी अधिवास आहे. या अधिवासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. कारण, वन विभागाला 'तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मधून वाघाची( sahyadri tiger ) छायाचित्र मिळाली आहेत.



'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाने ( sahyadri tiger ) गायीची शिकार केली होती. शिकार झालेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आल्यानंतर २६ आणि २७ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री वाघाची छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही क्लेमेंट बेन यांनी दिली. परिसरातील वाघाच्या ( sahyadri tiger ) हालचालीवर नजर ठेवून असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मदन शिरसागर यांनी दिली. तर पाळीव प्राण्यांची वन्यप्राण्यांकडून शिकार झाल्यास वन विभागाला कळवण्याचे आवाहन उपवनसंरक्षक एस.डी.नारनवर यांनी केली आहे. जेणेकरुन त्यासंबंधी नुकसान भरपाई देता येईल. यापूर्वी 'आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये देखील पट्टेरी वाघाचे ( sahyadri tiger ) छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे सिंधुदुर्गच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचा वावर आणि अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121