मुंबईत २५८ कोरोनाबाधितांची नोंद

२८७ कोरोनामुक्त तर ४ रुग्णांचा मृत्यू

    24-Nov-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बुधवार , दि. २४ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात २५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७४०५४७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
बुधवारी मुंबईत झालेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर शहरातील एकूण मृतांची संख्या १६,३१५ झाली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २३५३ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २५८५ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण १२ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,२२,३२,७८०
२४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - ३७,८०८

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.