मुंबईत १९६ कोरोनाबाधितांची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2021   
Total Views |

corona_1  H x W 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवार , दि. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात १९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७४०२६० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
 
मंगळवारी मुंबईत केवळ एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २३८८ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २५२६ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण १३ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १२१,९४,९७२
२३ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - २९,५२७
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@