राज्यातील हिंसाचाराविरुद्ध मुंबई भाजपची निदर्शने

राज्यातील या हिंसाचाराच्या विरोधात आणि या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावरील अमर जावं ज्योत या ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपातर्फे देण्यात आली आहे.

    19-Nov-2021   
Total Views |
 
amaravati_1  H
 
 
 
मुंबई : त्रिपुरा राज्यातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात हिंसाचार उफाळून आला होता. राज्यातील अमरावती, नांदेड,मालेगांव आणि अन्य काही शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, राज्यातील या हिंसाचाराच्या विरोधात आणि या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावरील अमर जावं ज्योत या ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
मुंबई भाजपच्या दक्षिण-मध्य जिल्हा आणि दक्षिण मुंबई जिल्हा यांच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी ही आंदोलने करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.