पवईत सर्व्हिस सेंटरला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |
 
fire-in-powai_20211128238
 
 
 
मुंबई : गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या पवई येथील एका कार सर्व्हिसींग सेंटर भीषण आग लागली. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ही आग लागली होती. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले आहे. आगीची भीषणता अधिक असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरील आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष प्रयत्न केले.अग्निशमन दलाचे सुमारे १० बंब आणि फायर इंजिनच्या मदतीने अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
 
 
 
 
आग लागलेली इमारत मोटार गाड्यांचे सर्व्हिस सेंटर असल्याने आतील भागात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचे प्रमाण वाढल्याची माहिती अग्निशमन दलाच्या काही अधिकाऱ्यांनी दिली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@