मुंबईतील प्राइम मॉलमध्ये भीषण आग ;

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |
 
fire_1  H x W:
 
 
 
मुंबई : मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या प्राइम मॉलमध्ये शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आगीचा भडका उडाला. ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून आगीत एक अग्निशमन दलाच्या एका जवानासह अन्य एक व्यक्तीही जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत तपास सुरू आहे.
 
 
 
विलेपार्ले पश्चिमेकडील इर्ला भागात प्राइम मॉल आहे. ही चार मजली इमारत असून आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास या मॉलच्या बेसमेंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पसरली. १६ फायर इंजिन, ११ वॉटर टँकर आणि इतर साधनसामग्री याच्या साह्याने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले व मोठा अनर्थ टळला. मॉलमधील या आग दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. त्यात अग्निशमन जवान मंगेश गावकर (५४) व मुबसीर मोहम्मद (२०) या तरुणाचा समावेश आहे. या दोघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुबसीर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@