"मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2021   
Total Views |

pratik_1  H x W 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या २२७ प्रभागांपैकी सर्वच प्रभाग फोडून त्यात नव्या ९ प्रभागांची भर पडायची असा निर्णय राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या मागे अनेक राजकीय गणितं मांड्ड्ण्यात आली आहेत. मात्र काहीही झाले तरी मुंबई आणि मुंबईच्या हितासाठी भाजपचा कार्यकर्ता काम करत राहील," अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे सचिव आणि भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य प्रतीक कर्पे यांनी 'दै.मुंबई तरुण भारत'शी बोलताना व्यक्त केली. राज्य सरकारतर्फे घेण्ययात आलेल्या मुंबईतील प्रभाग वद्वविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी कर्पे यांनी 'दै.मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
 
प्रतिक कर्पे म्हणाले की, "समहापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील अनेक महिन्यांपासून प्रभाग रचनेमध्ये काही तरी खोड घालण्यात येईल या करीत अनेक प्रयत्न केले मात्र, आपल्या या प्रयत्नांना निवडणूक आयोग संमती देणार नाही अशी भीती निर्मण झाल्या नंतर महापालिकेतील प्रभाग संख्या वाढविण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला. मात्र, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो ते म्हणजे कुणीही कितीही आणि काहीही बदल केले, नगरसेवकांची संख्या २२७ वरून २५० पर्यंत जरी वाढवली, तरी येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
आताचे हे सीमांकन नियमबाह्य
'राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या प्रभाग संख्येतील वाढीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम सीमांकनावर होणार आहे. मुळात २०११ साली झालेल्या लोकसंख्या मोजणीवरून प्रभागाच्या रचनेत बदल करणे अपेक्षित असते, आपल्याला ते बदल येतात. मात्र आता जे सीमांकन किंवा प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात येत आहेत, ते सीमांकनाचे नियम डावलून म्हणजेच नियमबाह्य पद्धतीने केले जात आहेत. यामुळे शहराचा स्थानिक आणि सामाजिक समतोल बिघडू शकतो," अशा भीती देखील प्रतिक कर्पे यांनी 'दै.मुंबई तरुण भारत'शी बोलताना व्यक्त केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@