गोंदियात पुन्हा एकदा बिबट्याची शिकार; शीर आणि पंजे गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

leopard _1  H x

शिकारीच्या दोन घटना उघड


मुंबई (प्रतिनिधी) - गोंदिया जिल्ह्यात बिबट्याची शिकार करुन त्याला विहिरीत टाकल्याची घटना ताजी असतानाच काल पुन्हा वन विभागाला याच परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या बिबट्याचे शीर आणि पंजे गायब आहेत. म्हणजेच या बिबट्याचाही शिकार झाल्याचे समोर आले आहे.
 
 
दोन दिवसांपूर्वी गोरेगाव वनपरिक्षेत्रातील इंदिरानगर, तिल्ली मोहेगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या मृतअवस्थेत आढळून आला. या बिबट्याला विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढील पायाचे पंजे गायब असल्याचे आढळून आले. हे प्रकरण ताजे असतानाच या परिसरापासून ५० मीटरच्या अंतरावर अजून एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचे शीर आणि पंजे घटनास्थळावरुन गायब आहेत. हा परिसर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येतो. मात्र, या क्षेत्रावर अजूनही वन्यजीव विभागाने नियंत्रण मिळवलेले नाही. हे बफर क्षेत्र ७ सप्टेंबर, २०१६ मध्ये घोषित झाले होते.

@@AUTHORINFO_V1@@