पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    11-Sep-2020
Total Views |

palghar_1  H x

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना कोरोनासोबत भूकंपाच्या सावटाखाली जगावे लागते आहे. काल रात्री आणि आज पहाटे पुन्हा सहा भूकंपाचे धक्के बसले आहेत. मध्यरात्री जवळपास सौम्य व मध्यम स्वरूपाचे पाच धक्के बसल्याची नागरिकांनी माहिती दिलीय. तलासरी, धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, कासा, बोर्डी, दापचरी, धानिवरी, आंबोली, चिंचणी आणि आजूबाजूचा परिसर भूकंपाने हादरला आहे.
रात्री ३ वाजून २९ मिनिटांनी ३.५ रीश्टर स्केल, ३ वाजून ४३ मिनिटांनी २.८ रीश्टर स्केल, ३ वाजून ४५ मिनिटांनी २.६ रीश्टर स्केल, ३ वाजून ५७ मिनिटांनी ३.५ रीश्टर स्केल, ५ वाजून ४ मिनिटांनी २.२ रीश्टर स्केल, ६ वाजता ४ .२ रीश्टर स्केल, ७ वाजून ६ मिनिटांनी ४.२ रीश्टर स्केल या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत.या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात ७ तारखेला डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का बसला होता.