दिलासादायक ! भारतात चाचण्यांच्या तुलनेत केवळ ५ टक्के लोकांना कोरोना

    08-Apr-2020
Total Views |

india usa_1  H  



मुंबई
 :  चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. चीनपाठोपाठ, इटली, स्पेन, इराणमध्ये जणू कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने जगाची चिंता वाढली आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना आता अमेरिकेच्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या फारच कमी आहे. त्यामागील कारणे निरनिराळी असू शकतात.


इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाबाबात उपाययोजना राबवायला लवकरच सुरुवात केली. कोरोनाचे भारतात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे कोरोना वाढीचा वेग थोपावण्यात भारताला मोठ्या प्रमाणात यश आले. मात्र दिल्लीच्या निझामुद्दिन येथे झालेल्या तबलिगींच्या मरकज कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे तबलिगींमुळे वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी मरकजमध्ये सहभागी तबलिगींनी शोधून त्यांना क्वारंटाईन करण्यात केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.
 
 
भारत : चाचण्या व रुग्णसंख्या आकडेवारी (६ मार्च ते ६ एप्रिल २०२०)
 
    

तारीख

चाचण्या

रुग्णसंख्या

६ मार्च 

४०५८

३१

१८ मार्च 

१३१२५

१६९

२१ मार्च 

१५७०१

३३२

२७ मार्च 

२७६८८

८८७

१ एप्रिल 

४७९५१

१९९८

६ एप्रिल 

१०१९६८

४७७८ 



दुसरीकडे, मार्च महिन्याच्या सुरवातीला अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अमेरिेकेतील सरकारने तेथे प्रांतनिहान लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, स्थानिक अमेरिकी नागरिकांनी त्याला गांभीर्याने घेतलेच नाही. अनेकांनी आपल्याला काही होत नाही, या अविर्भावात पब, पार्टी, कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. अखेर खडबडून जागे झालेल्या अमेरिकी सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवला. ६ मार्चला अवघ्या १७९४ चाचण्या करणाऱ्या अमेरिकेने महिन्याभरात म्हणजे ६ एप्रिलला तब्बल १९ लाख १७ हजार चाचण्या केल्या. त्यातून अमेरिकेतील रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली. त्यापैकी १३ हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजे एकूण चाचण्यांच्या तुलनेत अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे प्रमाण २० टक्के आहे.




अमेरिका : चाचण्या व रुग्णसंख्या आकडेवारी ( ६ मार्च ते ६ एप्रिल )


तारीख

चाचण्या

रुग्णसंख्या

६ मार्च 

१७९४

३१९

१८ मार्च 

७३९५५

९१९७

२१ मार्च 

१७९१०६

२४१९२

२७ मार्च 

६२६६३३

१०४१२६

१ एप्रिल 

११५०००६

२१५००३

६ एप्रिल 

१९१७०९५

३६७००४

 
त्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या फारच कमी आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण फारच कमी आहे. ६ मार्चला भारतात ४,०५८ चाचण्या झाल्या, त्याचे प्रमाण महिन्याभरानंतर म्हणजे ६ एप्रिलला एक लाखांवर गेले. त्यापैकी आतापर्यंत केवळ ५ हजार तीनशे लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा अर्थ असा की भारतातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण हे केवळ ५ टक्केच आहे. भारतातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे लवकर लावण्यात आलेला लॉकडाऊन, भारतीयांची आजारांशी लढण्याची प्रतिकारक्षमता आणि चाचण्याचे कमी असलेले प्रमाण आदी असू शकतात.