ओसामा आणि ‘तबलिगी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020   
Total Views |


osama and tabaligi connec



आज फक्त
‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दूरदूरच्या देश-प्रदेशात नेऊन लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्‍यांना वेगळे कुठले नाव देता येईल?



आठवड्याच्या आरंभी दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथे जमलेल्या हजारो ‘तबलिगी’ जमात सदस्यांमार्फत देशाच्या कानाकोपर्‍यात कोरोना व्हायरसची बाधा पोहोचल्यावर या संघटनेचे नाव गाजू लागले. पण, म्हणून अशी संघटना अकस्मात उगवलेली नाही. आताही त्याविषयी चर्चा सुरू झाल्यावर त्या संघटनेने माजवलेला हाहाकार ही मानवी चूक असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा पुरोगामी वा ‘सेक्युलर’ म्हणवणारे करीत आहेत. तितकेच नाही, तर त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दिवे लावून कोरोना कसा पळून जाईल, असली दिशाभूल करून तबलिगी चर्चेला फाटा देण्याचा आटापिटा चालू आहे. कारण, अशा कडव्या धर्मांध मुस्लिमांना किंवा जमात-ए-पुरोगामींना सत्य झाकून ठेवायचे आहे, अन्यथा ‘तबलिगी’ कारवायांमागील ओसामा बिन लादेनची प्रेरणा किंवा विचारधारा जगासमोर येण्याच्या भीतीने या भामट्यांना पछाडलेले आहे.



वरकरणी
‘तबलिगी’ सदस्यांचे वागणे चूक वा खुळेपणाचे, अंधश्रद्धेचे वाटले, तर ती तशी चूक करण्याचे कारण नाही. डोळसपणे त्यातला ‘जिहाद’ ओळखता व समजून घेता आला पाहिजे. ओसामाच्या प्रेरणेने फिदायीन झालेले व आत्मसमर्पण करून आपली धर्मश्रद्धा अधिक कडवी असल्याचे सिद्ध करायला निघालेले जिहादी आणि आज बाधा पसरवणारे ‘तबलिगी’ यांचा अजेंडा एकच आहे आणि त्यामागची रणनीती जशीच्या तशी समान आहे. अफगाण जिहादमधून सोव्हिएत फौजांना पाणी पाजल्यावर लादेन किंवा त्यातले अनेक मुल्ला मौलवी यांनी काय निष्कर्ष काढला होता? त्याची आठवण तरी आहे कोणाला? ती मंडळी म्हणत होती, नुसत्या अफगाणी जिहादने महाशक्ती असलेले सोव्हिएत साम्राज्य जमीनदोस्त केलेले आहे आणि त्याच मार्गाने अमेरिका व अन्य पुढारलेल्या देशांना इस्लामसमोर शरणागत करणे सहज शक्य आहे. त्याची रणनीती काय होती? अमेरिकेतील जुळे मनोरे पाडल्यावर ओसामाचे एक वक्तव्य आलेले होते. ते म्हणजे, “पाश्चात्य लोकशाही सत्तांना व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमीनदोस्त करायचे.


या एका वाक्यातील आधुनिक जिहादची व्याप्ती कधी समजून घेतली गेली नाही आणि त्यानुसार त्याला रोखण्यास योग्य पावले उचलली गेली नाहीत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये मध्यपूर्वेतील अरब देशांनी अनुभवला आहे आणि त्याचे दुष्परिणाम युरोपियन देशांना भोगावे लागलेले आहेत. त्याचाच पुढला टप्पा म्हणजे ‘तबलिगी’ने टाकलेले पाऊल आहे. लोकशाही सत्ता व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमीनदोस्त करायचे म्हणजे काय? यापैकी बहुतांश देशांनी आपल्याच कायदे व नियमांसह विविध भ्रामक संकल्पनांनी स्वत:ला जायबंदी वा जखडून ठेवले आहे. त्यांना त्याच्याच जखडणार्‍या नियम संकल्पनांनी घुसमटून टाकायचे आणि त्यात त्यांचाच गुदमरून मृत्यू सहज होऊ शकतो.



तो कसा
? तर जिहादला सज्ज झालेल्यांनी अशा तमाम लोकशाही उदारमतवादी व्यवस्था किंवा त्यांचे कायदे झुगारून वागायचे आणि त्यात गुन्हेगार ठरले, तरी आपल्याला न्याय देण्याची जबाबदारी मात्र त्याच व्यवस्थांवर टाकायची. कारण, त्यांनी ‘मूर्ख न्याया’च्या संकल्पनेचा फास आपल्याच गळ्याभोवती आवळलेला आहे. आपल्याच पायात उदारमतवादी बेड्या ठोकून घेतलेल्या आहेत. अमेरिकेने सेना पाठवून अफगाणिस्तानची तालिबानी सत्ता उद्ध्वस्त केली. पण, तिथे लोकशाही पद्धतीनेच अमेरिकन सैन्याचे हातपाय बांधून ठेवलेले होते. साहजिकच कोणी अमेरिकन सैनिक नागरिक तालिबानांच्या हाती लागला, तर त्याला हालहाल करून मारायची मुभा जिहादी तालिबानांना उपलब्ध होती आणि त्यांच्यापैकी कोणा तालिबानाला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याची वा छळवाद करून सूडाने वागण्याची मोकळीक अमेरिकन सैनिकांना नव्हती. जीवंत पकडला तर खटल्याचा पोरखेळ चाले आणि तालिबान मात्र अमेरिकनांना दयामाया दाखवत नव्हते. गळा चिरून वा कुठेही गाफील पकडून ठार मारत होते. पण, तसेच कुणा अमेरिकनने केले, तर मात्र त्याच पाश्चात्य कायद्याकडे दादही मागत होते. यातला बोजा लक्षात येतो का?


एक फिदायीन वा जिहादी जीवंत मिळाला तरी त्याच्यावर खटला चालवून फाशी देण्यासाठी भारताने कसाबवर किती खर्च केला
? त्याच्या खटल्यासह सुरक्षेसाठी किती कोटी रुपये खर्च झाले? पण, कसाब व त्याच्या साथीदारांनी पावणे दोनशे मुंबईकरांची कत्तल केली, त्यावर काही लाखच रुपये तोयबा-जैश मंडळींना खर्चावे लागले ना? म्हणजेच दोन्हीकडून नुकसान तुमचेच! कसाबला उपचार व न्याय देण्याचा बोजासुद्धा तुमच्यावर त्याच कायद्यामुळे आणला जात असतो. यालाच ‘ओसामा बोजाखाली चिरडून मारणे’ म्हणतो. ओसामाला शोधण्यापासून कमांडो पाठवून ठार मारण्यापर्यंत अमेरिकेला किती कोटी डॉलर्सचा खर्च करावा लागला होता? त्याची पाठराखण करून अमेरिकेशी दगाफटका पाकिस्तानच करीत होता ना? मग आज ‘तबलिगी’ फरारी कोरोनाबाधितांचा शोध घेण्यावर होणारा खर्च वा शासकीय यंत्रणेवर पडणारा बोजा कोणाला उचलावा लागतो आहे?



त्या ‘तबलिगीं’ना लपायला साहाय्य करून सरकारी यंत्रणेची तारांबळ कोण उडवित आहे? अशा बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करायचे, अधिक त्यांनी कोरोनाची लागण केलेल्यांना शोधून त्यांच्यावरही खर्च कोणी करायचा? त्या खर्चाचा बोजा कोणी उचलायचा आहे? तो खर्च ‘तबलिगी’चे समर्थन करणारे पुरोगामी शहाणे किंवा ओवेसीसारखे नाकर्ते उचलणार नाहीत. म्हणजेच सगळीकडून आपल्या लोकशाही उदारमतवादी पुरोगामी राज्यपद्धतीने आपल्यालाच गोत्यात आणलेले आहेत. त्यात कायदा मोडणारे व धाब्यावर बसवणार्‍यांना कायद्याची पर्वा नाही आणि त्याच लोकांच्या जगण्याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे. आपल्या सरकारने घ्यायची आहे आणि त्याचा बोजा सामान्य कायदेभिरू भारतीयांच्या डोक्यावर पडतो आहे. ‘अर्थव्यवस्था ढासळतेय’ म्हणून रोज घसा कोरडा करणार्‍या चिदंबरम वा राहुल गांधींना अशा बोजाचा थांगपत्ता तरी आहे का? मेणबत्ती दिवे लावण्याच्या आवाहनावर टीकेचे प्रवचन देण्यार्‍यांना याची जाणीव तरी आहे का?



ओसामा किंवा ‘तबलिगी’चा म्होरक्या मौलवी साद कांधालवी, यांच्या विचारसरणीतले साम्य साधर्म्य लक्षात येते आहे का? नावाने संघटना वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचे विचारसूत्र एकच आहे. त्यांचे ध्येय, अजेंडा समान आहे. ओसामाने किंवा त्याच्या पिल्लावळीने आधी सोव्हिएत व नंतर अमेरिकन व्यवस्थेला पर्यायाने साम्राज्याला त्यांच्याच नियम-कायदे आणि संभ्रमाच्या बोजाखाली भरडून काढले. सोव्हिएत व्यवस्था त्यात तीन दशकांपूर्वी उद्ध्वस़्त होऊन गेली आणि आज अमेरिकन साम्राज्य डबघाईला आलेले आहे. एकट्या चीनने पोलादी पंजाने त्या देशातल्या अशा धार्मिक मुस्लीम अरेरावीला दडपून टाकल्याने त्याचा टिकाव लागला आहे. तो विषय नंतर तपासता येईल. आज फक्त ‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते.



मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दूरदूरच्या देश-प्रदेशात नेऊन लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्‍यांना वेगळे कुठले नाव देता येईल
? ओसामाचे सहकारी उमर खालीद शेख किंवा जवाहिरी यांनी केलेल्या कारवाया जगाला कुठे घेऊन गेल्या आहेत? त्यासाठी त्यांना कुठली मोठी किंमत मोजावी लागली आहे? आपल्या चिमूटभर कारवायांतून त्यांनी जगभरच्या विमानप्रवास, विमानतळ किंवा तशा व्यवस्थांना सुरक्षा उपायांच्या बोजाखाली भरडून टाकलेले आहे. तबलिगी लोकांनी कोरोनाचा फैलाव सहज सोपा करून भारतीयच नव्हे, तर इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी अनेक देशांच्या शासकीय वैद्यकीय यंत्रणांना घुसमटून टाकलेले आहे. ओसामाच्या ‘अल कायदा’चा गवगवा जगभर चालू होता आणि ‘तबलिगी’बाबतीत कोणी चकार शब्द बोलत नव्हता. पुरोगाम्यांनी पत्रकारांनी बुद्धिवादी शहाण्यांनी जगाला किती गाफील ठेवले आणि गोत्यात आणले आहे, त्याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे का?

@@AUTHORINFO_V1@@