खोट्याच्या कपाळी गोटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2020   
Total Views |
fake news_1  H


तामिळनाडूतील पक्ष प्रवक्ते अमेरिकाई नारायणन यांनी पाकिस्तानातील दोन वर्षे जुना फोटो सोशल मीडियावर टाकून स्थलांतरीत कामगारांचे सध्याच्या ‘लॉकडाऊन’मध्ये कसे हाल होत आहेत, अशी अफवा पसरवली नसती. त्यांच्या त्या खोटेपणाकडे लोकांनी लक्ष वेधले असता, ते ट्विट रद्द करण्यापेक्षा त्यांनी भारतातही तसेच घडू शकेल, असा इशारा सरकारला देण्यासाठी तो फोटो वापरल्याचा बेशरम खुलासा केला आहे. देश व कोट्यवधी जनता कुठल्या संकटात आहे, त्याविषयी इतकी भावनाशून्यता केवळ काँग्रेस पक्षच दाखवू शकेल ना? अर्थात, फक्त काँग्रेसला दोष देण्याचे कारण नाही. इतरही ‘मान्यताप्राप्त’ मोदीद्वेषी व पुरोगामी लोकही अगत्याने आपल्या देशद्रोही कर्तव्याचे अगत्याने पालन करून खोट्या बातम्या व अफवांचे रतीब घालतच आहेत.


सध्या अवघ्या जगाला कोरोनाने भंडावून सोडलेले असताना जगातला महाशक्ती देश अमेरिकाही त्यात पूर्णपणे अडकलेला आहे. ओसामा बिन लादेन वा जगातल्या कुठल्याही दहशतवादाला आव्हान देणार्‍या अमेरिकेला या नव्या कोरोनाचा सामना करता आलेला नाही. उलट त्याच्या तुलनेत चौपट लोकसंख्या व अगदीच दुबळी शासन यंत्रणा हाताशी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थपणे कोरोनाशी दोन हात केल्याने त्यांचे जगभरात कौतुक चालले आहे. खुद्द अमेरिकाही मोदींचे गुणगान करीत आहे. पण, मायदेशी सत्तर वर्षे देशाला अशा दुरवस्थेतच खितपत ठेवण्याचे कर्तृत्व असलेल्या काँग्रेस पक्षाने मात्र कोरोनाचे आपण सख्खे भाऊ असल्याची साक्ष द्यायचेच ठरवलेले आहे. म्हणून काँग्रेसच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्ते, प्रवक्त्यांपर्यंत प्रत्येकजण कोरोनाला कसा हातभार लागेल, त्यासाठी झटतो आहे. त्यात माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी सरकारी प्रयत्नातल्या त्रुटी आपल्याच ‘अकलेनुसार’ काढत आहेत आणि त्यांच्याच आदर्शामुळे अन्य नेते, प्रवक्ते शक्य तितका खोटेपणा करून जनतेला भंडावून सोडण्याचे ‘पक्षीय’ कर्तव्य पार पाडत आहेत. तसे नसते तर तामिळनाडूतील पक्ष प्रवक्ते अमेरिकाई नारायणन यांनी पाकिस्तानातील दोन वर्षे जुना फोटो सोशल मीडियावर टाकून स्थलांतरीत कामगारांचे सध्याच्या ‘लॉकडाऊन’मध्ये कसे हाल होत आहेत, अशी अफवा पसरवली नसती. त्यांच्या त्या खोटेपणाकडे लोकांनी लक्ष वेधले असता, ते ट्विट रद्द करण्यापेक्षा त्यांनी भारतातही तसेच घडू शकेल, असा इशारा सरकारला देण्यासाठी तो फोटो वापरल्याचा बेशरम खुलासा केला आहे. देश व कोट्यवधी जनता कुठल्या संकटात आहे, त्याविषयी इतकी भावनाशून्यता केवळ काँग्रेस पक्षच दाखवू शकेल ना? अर्थात , फक्त काँग्रेसला दोष देण्याचे कारण नाही. इतरही ‘मान्यताप्राप्त’ मोदीद्वेषी व पुरोगामी लोकही अगत्याने आपल्या देशद्रोही कर्तव्याचे अगत्याने पालन करून खोट्या बातम्या व अफवांचे रतीब घालतच आहेत.


अमेरिकाई नारायणन यांनी आपल्या ट्विटर खात्यावर २०१८ सालचा पाकिस्तानातील काही मुलांचा फोटो टाकलेला आहे. त्यात त्या मुलांच्या पायाचे तळवे सोलवटून निघालेले असून ती मुले भारतातली असावी, असे भासवण्याचा त्यांचा प्रयास आहे. ‘लॉकडाऊन’मुळे महानगरातून रोजगाराशिवाय मजूर तडफडत आहेत आणि म्हणूनच उपाशी रहाण्यापेक्षा आपापल्या गावी व जिल्ह्यात जायला निघाले आहेत, असे आरोप काँग्रेस पहिल्या दिवसांपासून करीत आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य असले तरी अनेक राज्य सरकारांनी आपल्या पातळीवर बहुतांश परप्रांतीय मजूरांना निवारा व खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. ती करणार्‍या राज्य सरकारांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असलेली राजस्थान पंजाब अशीही राज्ये आहेत. पण, काँग्रेसला मोदींवर बालंट आणायचे राजकारण करायचे असल्याने कुठल्याही अफवा पिकवणे व त्यातून सामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवणे; हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. त्यासाठी प्रवक्ते म्हणून जुन्या पोसलेल्या पत्रकारांचीही मदत घेतली जात आहे. अनेक डाव्या विचारांचे ज्येष्ठ पत्रकार तशा बातम्या सोडायला व शिजवायला अहोरात्र झटतही करीत आहेत. त्यांनी कुठल्या तरी स्थानिक पेपर वा सोशल मीडिया खात्यावरून मुळची बोगस बातमी वा माहिती सोडायची आणि मग त्यांच्याच बगलबच्च्याने जिल्हा वा छोट्या शहरी वर्तमानपत्रात त्याची बातमी झळकवायची, हा खाक्या आहे. नंतर राज्य वा दिल्लीतल्या कुणा वाहिनी वा मोठ्या दैनिकात त्याला झळकवायचे आणि चर्चेचे आरोपाचे काहूर माजवायचे, ही शैली झालेली आहे. त्यात नेहरू विद्यापीठापासून विविध स्वयंसेवी संस्थांचे म्होरकेही कार्यरत आहेत. अमेरिकाई नारायणन त्याच फौजेचे सैनिक आहेत. एकदा तितकी काडी त्यांनी घातली, मग त्यांचेच साथीदार सरकारला जाब विचारत धुमाकूळ घालू लागतात. ही गुन्हेगारी ‘मोडस ऑपरेन्डी’ झालेली आहे. त्यातून आपण लाखो जीवांशी खेळ करतोय, याचेही साधे भान त्यांना उरलेले नाही.


अर्थात, काँग्रेसी वा पुरोगामी मंडळींचा हा खोटेपणा वा अफवांचा बाजार हल्लीचा किंवा नवा नाही. मोदी पंतप्रधान झाल्यावर तो सुरू झालेला नाही. गेल्या दोन दशकात त्याची बाजारपेठ हळूहळू पसरत गेलेली आहे आणि त्याच ‘ फेक न्यूज’च्या व्हायरसने अनेक वर्तमानपत्रे, माध्यमे व वाहिन्यांची बाजारातील पत केव्हाच संपून गेलेली आहे. पण, म्हणून या पुरोगामी व्हायरसची भुक संपलेली नाही. ज्यांची विश्वासार्हता २०१४ साली मोदींच्या व भाजपच्या यश व विजयाने संपुष्टात आली, त्यांना आता माध्यमात कोणी विचारत नाही. अनेक मालकांनी त्यांना हाकलून लावलेले आहे. कुणाच्या तरी वळचणीला जाऊन त्यांना आश्रय घ्यावा लागलेला आहे. कारण, केवळ त्यांचे लिखाण प्रसिद्ध होते वा त्यांचे चेहरे दिसतात, म्हणूनच वाचक वा श्रोत्यांनी अशा माध्यमांवरच बहिष्कार घातलेला आहे. परिणामी, त्यांनाच देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. साहाजिकच अशा लोकांना आता सोशल मीडिया वा इतरत्र किरकोळ स्वरूपात अफवांचे पीक काढावे लागते आहे. पण, बाजारात निदान आपल्याला स्थान असावे, म्हणून असे कालबाह्य लोक आपल्या चेलेचपाट्यांना हाताशी धरून मग त्याच अफवांना मुख्यप्रवाहातील माध्यमात आणतात आणि दिशाभूल करीत असतात. कविता कृष्णन, सिद्धार्थ वर्धराजन, शेखर गुप्ता, योगेंद्र यादव इत्यादी नावे आता लोकांना पूर्णपणे परिचित झाली आहेत. त्यांची कुख्याती इतकी झालेली आहे की, दिवसाढवळ्या त्यांनी सूर्य उगवला म्हटले, तरी आज लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत; अन्यथा अशाच लोकांनी सर्वस्व पणाला लावून टाळ्या-थाळ्या वा दिवे पेटवण्याची मोदींची देशव्यापी मोहीम यशस्वी कशाला झाली असती? अशा लोकांची वा त्या काँग्रेसच्या दलालांची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, आजकाल त्यांच्या खोटेपणावर कोणीच विश्वास ठेवत नाही. पण, त्यांचा मात्र त्यावर पूर्ण विश्वास असतो. म्हणून ते अधिकच जोमाने खोटेपणा करीत असतात. त्यांना जगासमोर उघडे पडण्याचीही शरम उरलेली नाही.


अर्थात, हे सर्व फुकटातले नाही वा भारतापुरतेही नाही. अशा उद्योगाला आर्थिक साहाय्य देणारे त्यांचे परदेशी धनीसुद्धा आहेत. भारताची बदनामी करण्यासाठी त्यांना डॉलर्समध्येही मलिदा मिळत असतो. म्हणून तर भारतातले कोरोनाग्रस्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’साठी हेडलाईनचा विषय होतो. मात्र, प्रत्यक्ष त्याचे नाव असलेले जागतिक आर्थिक राजधानीचे शहर न्यूयॉर्क, कोरोनाची सर्वात मोठी स्मशानभूमी झाल्याची त्या वर्तमानपत्राला जाणीवसुद्धा नाही. ब्रिटन व अमेरिका जगातले सर्वात मोठे कोरोनाबाधित देश आहेत आणि तिथल्या दुर्दशेपेक्षा भारतात लोक सुरक्षित व सुखरूप आहेत. पण, ‘बीबीसी’ किंवा तसेच अमेरिकन पेपर मात्र भारतातल्या रुग्णांसाठी आक्रोश करीत असतात. त्यापैकीच काही खाडीदेशातील इंग्रजी वर्तमानपत्रात भारतात लोक किडामुंगीसारखे मरत असल्याच्याही अफवा पसरवतात. कोणी कोरोना मृतांचे पार्थिव धर्मानुसार भेदभाव करून वागवले जाते, अशा अफवा पिकवतात. कोणी ‘तबलिगी’चे नाव घेऊन मुस्लिमांचा छळ चालल्याच्या कंड्याही पिकवतात. मग एक प्रश्न असाही विचारला जातो की, ‘मोदी सरकार अशा अफवाबाजांचा गजाआड कशाला टाकत नाही?’ तर त्याचेही उत्तर द्यावेच लागेल. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. सामान्य श्रोता व वाचकांनेच त्यांना बहिष्कृत केलेले असताना किंवा ‘पत्रकार’ म्हणून ज्यांची ओळखच उरलेली नसताना कायद्याचा बडगा उगारून त्यांना महत्त्व तरी कशाला द्यायचे? कोरोनाला हरवण्याची तातडी असताना निरूपयोगी व निरुपद्रवी असलेल्या अशा पुरोगामी व्हायरससाठी शक्ती खर्चावी तरी कशाला? म्हणून मोदी-शाहा त्यांच्या कुठल्याही उचापतींवर कारवाईसुद्धा करत नाहीत. जे आपल्या कर्मानेच मरत आहेत, त्यांना आत्महत्येसाठी मदत कशाला करायची ना? आज त्यांच्यावर मोदींनी कारवाई करणे वा त्यांची दखल घेणेही त्यांच्यासाठी सन्मानाचे आहे. त्यांना उलट्या बोंबा ठोकायला दिलेली संधी ठरेल. म्हणून त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करणे, हीच मोठी कठोर कारवाई आहे. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात ना?
@@AUTHORINFO_V1@@