आम्ही कोरोनाला हरवणार : रा.स्व.संघातर्फे जनजागृती अभियान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |


rss corona awareness_1&nb


नवी दिल्ली : एकीकडे लोक कोरोनाच्या भीतीने घरांमध्ये आहेत, तर काही लोक लॉकडाउननंतरही या व्हायरसला गंभीरपणे न घेता रस्त्यावर उतरत आहेत. दुसरीकडे, डॉक्टर, पोलिस प्रशासन यांच्यासह देशातील कोट्यवधी जबाबदार लोक कोरोनावर मात करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. यालाच हातभार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एक पाऊल पुढे टाकत जनजागृती अभियान राबविले आहे. रा स्व संघाचे स्वयंसेवक आणि जबाबदार कार्यकर्ते आता कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की संघाचे काही स्वयंसेवक मध्यप्रदेशमधील खेड्यातील रस्त्यांची स्वच्छता तसेच फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात गुंतले आहेत. त्याच वेळी,काही स्वयंसेवक घरोघरी जाऊन मास्कचे वाटप करत नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.






संघाच्या एका कार्यकर्त्याने ट्विट केलेल्या छायाचित्रात तुम्ही पाहू शकता की
, स्वयंकसेवक संघाचे कार्यकर्ते लोकांना हात कसे धुवावेत, स्वच्छता कशी राखायची याचे मार्गदर्शन करत आहेत. तर दुसर्‍या चित्रात, संघाचे स्वयंसेवक हातात लाउडस्पीकर घेऊन कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्याचप्रमाणे घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहनही करीत आहेत. तर केरळमध्येही रा स्व संघाचे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये स्वच्छता करण्याच्या कामात सहकार्य करत आहेत.आपण सोशल मीडियावरील या फोटोंमधून आणि व्हिडिओंवरून हे पाहू शकता की स्वयंसेवक त्यांच्या जीवाची पर्वा न करता, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.तर राजस्थानमध्येही संघ स्वयंसेवकांनी राबविलेल्या उपक्रमातून हातावर पोट असणाऱ्या मजूर व गरीब कामगारांसाठी जेवणाची सोय केली आहे.





महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच हातावरचे पोट असणाऱ्या मुंबईतील कामगार आणि कष्टकऱ्यांची दोन वेळच्या जेवणाची मोठी आबाळ होत आहे. यावर उपाय म्हणून रा.स्व.संघाच्या जनकल्याण समिती मुंबईने 'अन्नपूर्णा' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, कारागीर यांना दोन वेळचे जेवण पोहोचवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी घेतली आहे. यासाठी मुंबईतील काही कुटूंबांनी ही जबाबदारी उचलली आहे.



@@AUTHORINFO_V1@@