कोरोनाशी लढा : रा.स्व.संघातर्फे 'अन्नपूर्णा' उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
annapurna_1  H
 
 
 

तुम्हीही सहभागी होऊ शकता

मुंबई : कोरोनाशी लढा देत असताना लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच हातावरचे पोट असणाऱ्या मुंबईतील कामगार आणि कष्टकऱ्यांची दोन वेळच्या जेवणाची मोठी आबाळ होत आहे. यावर उपाय म्हणून रा.स्व.संघाच्या जनकल्याण समिती मुंबईने 'अन्नपूर्णा' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, कारागीर यांना दोन वेळचे जेवण पोहोचवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी घेतली आहे. यासाठी मुंबईतील काही कुटूंबांनी ही जबाबदारी उचलली आहे.
 
 
आपल्या परिसरातील गरजू आणि भुकेल्या जीवांनाही आपण मदत करू इच्छीत असाल तर https://forms.gle/VZotN1qLmUhixhxu8 या लिंकवर जाऊन फॉर्म भरावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुंबईतर्फे करण्यात येत आहे.




 
 
@@AUTHORINFO_V1@@