बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील 'दीदी'ला मिळाले पालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2020   
Total Views |
leopard _1  H x

 

 

युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी स्वीकारले पालकत्व

 
 
 
 
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या निवारा केंद्रातील 'दीदी' नामक बिबट्याच्या अडीच महिन्यांच्या मादी पिल्लाला पालक मिळाले आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि युवासेना कार्यकारिणीचे सदस्य सिद्धेश कदम यांनी आज या पिल्लाचे पालकत्व स्वीकारले. नाशिकवरुन या अनाथ पिल्लाला फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.
 
 
 


leopard _1  H x
 
 
 
गेल्या आठ वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 'वन्यप्राणी दत्तक योजना' राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिंजराबंद अधिवासातील म्हणजेच 'व्याघ्र-सिंह सफारी' व 'बिबट्या निवारा केंद्रा'तील प्राण्यांना दत्तक देण्यात येते. या दत्तकत्वाचा कालावधी वर्षभराचा असतो. याकरिता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून काही रक्कम आकारण्यात येते. यामध्ये दत्तक प्राण्याचा वर्षभराचा वैद्यकीय आणि उदरभरणाच्या खर्चाचा समावेश असतो. राष्ट्रीय उद्यानाच्या या योजनेमधील पालकांच्या यादीत आता सिद्धेश कदम यांचा समावेश झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सचिन रेपाळ यांनी दिली. आज त्यांनी दत्तक योजनेअंतर्गत बिबट्याच्या मादी पिल्लाचे पालकत्व स्वीकारल्याचे रेपाळ यांनी सांगितले.
 
 
 

leopard _1  H x 
 
 
नाशिकमधील एका उसाच्या शेतात हे पिल्लू २९ जानेवारी रोजी बेवारस अवस्थेत सापडले होते. वन विभागाने ४ फेब्रुवारी पर्यंत या पिल्लाचे त्याच्या आईसोबत पुनर्मिलन करण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले. मात्र, त्यात अपयश आल्याने सरतेशेवटी या पिल्लाची 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त रवानगी करण्यात आले. हे मादी पिल्लू आमच्याकडे आले त्यावेळी तिचे वजन १,१०० ग्रॅम ऐवढे होते, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. सुरुवातीला तिला दूधही पिता येत नव्हते. तिला दूध पिण्याचे शिकवून उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकातील सद्स्यांनी तिची काळजी घेतली. आता तिला खाद्य म्हणून कोंबडीचे मांस देण्यात येत असून तिचे वजन अडीच किलो झाल्याचे पेठेंनी सांगितले. या पिल्लाला दत्तक घेतल्यानंतर सिद्धेश यांनी तिचे नामकरण 'डुडु' असे केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@