पालघर साधूहत्या : ३२ आरोपींना १५दिवसांची न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |

palghar_1  H x


पालघर :
बहुचर्चित गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात सीआयडीने अटक केलेल्या ३२ नव्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यातील २४ आरोपी गडचिंचले परिसरातील व ८ आरोपी सिल्वासा भागातील आहेत. डहाणू न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.वी.जावळे यांनी या ३२ आरोपींना आज १५दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


सर्व आरोपींना पालघर सब जेलमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. सीआयडीने याप्रकरणी आणखी १८ आरोपींना ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांनाही डहाणू न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे येथील गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणातील ६२ आरोपींच्या जामिनावर अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार होती. ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी ६२ आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी ३ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. राज्य विशेष वकील सतीश मानेशिंदे यांनी या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीशांनी ३ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


सीआयडीने बुधवारी १६ एप्रिलला या प्रकरणात २०८ नवीन आरोपींची नावे दिली होती. यापैकी अटक केलेल्या ३२ आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले, तर आणखी १८ आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणात एकूण ३६६ आरोपी असून त्यापैकी ११ अल्पवयीन आहेत. यापैकी २८ आरोपी व ९ अल्पवयीनांची नावे सीआयआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात समाविष्ट नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्याचे झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@