‘इसिस’चे बदलते महिला धोरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020   
Total Views |

jp _1  H x W: 0


संघटनेचा सर्वाधिक प्रभाव असणार्‍या ‘रुमियाह’ (पूर्वीचे नाव ‘दाबिक’) या डिजिटल नियतकालिकाचा वापर केला जातो. या नियतकालिकाद्वारे ‘इसिस’ आपले कथित तत्त्वज्ञान आणि संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापित करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा प्रचार करते.



‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या भर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रपोगंडाचा वापर करते. त्यासाठी अर्थातच संघटनेचा सर्वाधिक प्रभाव असणार्‍या ‘रुमियाह’ (पूर्वीचे नाव ‘दाबिक’) या डिजिटल नियतकालिकाचा वापर केला जातो. या नियतकालिकाद्वारे ‘इसिस’ आपले कथित तत्त्वज्ञान आणि संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापित करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा प्रचार करते. हे नियतकालिक मुख्यत: पुरुषांना लक्ष्य ठेवून चालविले जाते, जेणेकरून जास्तीत जास्त कट्टरतावादी मुस्लीम पुरुषांची दहशतवादी संघटनेत भर्ती व्हावी. मात्र, आता या नियतकालिकाने जास्तीत जास्त प्रमाणात मुस्लीम महिलांना कसे सहभागी करून घेता येईल, याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ‘इसिस’ केवळ पुरुषांचाच सहभाग असलेली हिंसक संघटना नाही, तर ‘इसिस’ ही विशिष्ट उद्देशाने कार्यरत असणारी सामाजिक क्रांती आहे, हे दाखविण्यासाठी महिलांचा सहभाग या कट्टरताद्यांना हवा असतो. ‘इसिस’ची स्थापना झाल्यापासून स्वेच्छेने त्यात सहभागी होणार्‍या महिलांची संख्याही साधारणपणे १५ टक्के असल्याचा दावा केला जातो; अर्थात ‘स्वेच्छा’ या शब्दाचा अर्थ इस्लाममध्ये ‘जबरदस्ती’ असाच असतो; हे वेगळे सांगायला नको. मात्र, या नियतकालिकाद्वारे महिलांसाठी कशा प्रकारचा प्रपोगंडा चालविला जातो, ते अभ्यासणे महत्त्वाचे आहे. त्यातून ‘इसिस’च्या एकूणच कार्यपद्धतीविषयी फारशा बाहेर न येणार्‍या विषयांची माहिती मिळते.



जगभरातील विविध भाषांमध्ये प्रसारित होणार्‍या या नियतकालिकामध्ये खासकरून पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी हिंसक छायाचित्रांचा भरमसाठ वापर केला जातो. अशा प्रकारचा भडिमार करून वाचणार्‍यांच्या संवेदशीलतेला हळूहळू बोथट करणे, त्यासोबतच्या कट्टरतावादी धार्मिक मजकुरामुळे त्यांचे ब्रेनवॉशिंग करणे आणि इस्लामसाठी लढणे, हे एकच ध्येय त्यांच्या मनात बिंबविणे, हा हेतू त्यामागे असतो. पुरुषांना अल्लाच्या आदेशाचे पालन करणे आणि त्यासाठी सक्रियपणे हिंसेचा मार्ग पत्करणे, असा संदेश असतो. मात्र, महिलांसाठी नियतकालिकाची भाषा अगदीच बदललेली असते. महिलांना त्यांच्या कथित कर्तव्याची जाणीव करून देण्यावर भर असतो. ते कर्तव्य म्हणजे, महिलांचे मुख्य काम हे नव्या दमाच्या सैनिकांना जन्म देण्याचे आहे. पुढे जाऊन केवळ ‘इसिस’साठी लढणार्‍या आणि इस्लामसाठीच आपले आयुष्य खर्च करणारी उत्तम अशी ‘मुजाहिदीन’ संतती जन्माला घालणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे. हास्यास्पद बाब म्हणजे, ‘इसिस’ महिलांना त्यांचे जीवन सुखकर, सशक्त करण्याचे आश्वासनही देते. नियतकालिकाच्या एका अंकामध्ये तर ‘इसिस’ महिला आणि पुरुषांमध्ये कोणताही भेदभाव करीत नसल्याचा दावा करण्यात आला होता. ‘इसिस’कडे असलेल्या शाळांमध्ये मुलांसोबत मुलींनाही धर्म, विज्ञान, गणित आदी विषयांचे शिक्षण दिले जाते.


‘इसिस’च्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलांसोबत मुलींनाही प्रवेश दिला जातो. एवढेच नव्हे, तर अशा सुशिक्षित महिलांना तर नोकर्‍याही दिल्या जातात. एकूणच चांगले आयुष्य जगायला जे काही लागते, ते सर्व ‘इसिस’ देते, असा प्रपोगंडा खास महिलांसाठी राबविला जातो. आपले घरदार आणि पतीला सोडून दहशतवादी संघटनेत सामील होणार्‍या महिलांना तर अगदीच क्रांतिकारी समजले जाते. तुमचा पती तुमच्यावर दबाव आणत असेल आणि अशा पापी जगात राहूनही त्याचा त्यांना अभिमान वाटत असेल, तर तुम्ही त्याला त्याच जगात सोडणे श्रेयस्कर आहे. जगावर पवित्र इस्लामचे राज्य येण्यासाठी आणि आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे, असे वाटत असेल तर आपल्या प्रियजनांचा त्याग करणेच योग्य आहे. अशा प्रकारे अगदीच साखरेत घोळविलेल्या विखारी विचाराला महिलांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी ‘इसिस’ महिलांचा वापर केवळ कारकुनी प्रकारच्या कामांसाठी करीत असे. मात्र, गेल्या काही काळापासून हिंसक कारवायांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. महिलांना आता युद्धआघाड्यांवर पाठविणे, हिंसक कारवायांची आखणी करणे, यामध्ये महिलांना आता अधिकाधिक पुढे आणले जात आहे. यामुळे आता ‘इसिस’विरोधी लढ्याचीही रणनीती आता बदलण्याची गरज यामुळे निर्माण झाली आहे. महिलांचा ‘इसिस’कडे वाढता ओढा रोखण्यासाठी काम करावे लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@