काँग्रेसचे आदर्शच 'अली जिना' : गिरीराज सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


giriraj singh_1 &nbs


पटणा : काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपने काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस आणि शिवसेनेचा समाचार घेतला.त्यांनी काँग्रेसचे आदर्श 'जिना' आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असणार आहे. त्याबरोबरच शिवसेनेवरही त्यांनी टीका केली.


ते पुढे म्हणाले कि
,"तो दिवस दूर नाही जेव्हा कॉंग्रेस 'जिना' किती चांगले होते य आशयाच्या पुस्तकाचे वाचन करतील. ते जीनांना एक आदर्श मानतात आणि म्हणूनच ते सावरकरांना शिव्या देतात.' मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सेवा दलाच्या १० दिवसीय शिबिरात कॉंग्रेसने पुस्तकाचे वाटप केले त्या पुस्तकावर सध्या टीका होत आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, 'अनुच्छेद ३७०, सर्जिकल स्ट्राईक, नागरिकता दुरुस्ती कायदा आणि तीन तालक याविषयी काँग्रेसची आणि पाकिस्तानची भूमिका नेहमीच सारखी राहिली आहे.'



तर दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सेवा दलाच्या पुस्तकाबद्दल म्हणाले, 'भोपाळमधले काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहित नाही. पण शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता? वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे त्यावर बंदी आहे." असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.



@@AUTHORINFO_V1@@