‘स्वा. सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


ashsish shelar_1 &nb



मुंबई : काँग्रेसच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या पुस्तिकेत वीर सावरकारांबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले असून या पुस्तकावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी रणजित सावरकरांनी केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. याबाबत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करत काँग्रेसचा निषेध केला.



ते म्हणतात,'मा.मुख्यमंत्री महोदय तुमच्या महाराष्ट्र धर्माच्या पालनात जर स्वा.सावरकर येत असतील? तर तातडीने सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला. मराठी बाणा दिसू द्या ! देशभक्तीच्या प्रतिकांवर काँग्रेसकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध. आम्ही सारे सावरकर!" अशा तीव्र शब्दात त्यांनी काँग्रेसचा निषेध केला. तसेच महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची खोडच असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती.

 



रणजीत सावरकर यांनीही या पुस्तकावर तीव्र आक्षेप घेत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काल मध्यप्रदेशमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पुस्तिका सेवा दलच्या सदस्यांना वाटण्यात आली. अशाप्रकारे सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन सरकारने कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 


आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. ही त्या पक्षाची बौद्धीक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. भारतीय जनता पार्टी या पुस्तकाचा तीव्र निषेध करते. हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर पहिली प्रतिक्रिया त्यांनीच आपल्या खास शैलीत दिली असती. आज तशी अपेक्षा करता येत नसली तरी या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी अपेक्षा आहे.’ - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते




@@AUTHORINFO_V1@@