सोशल मीडियाचे व्यसन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019   
Total Views |


 

 
ज्या फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटरचे भारतात सध्या कमालीचे कोडकौतुक चालले आहे, त्या माध्यमातून राजकीय युद्ध लढले जात असल्याचा कांगावा करत, प्रत्यक्ष मतदानापूर्वी फेसबुक ब्लॅकआऊट करण्याच्या शक्यतेवरही विचार केला जात असताना, अमेरिकेतील सुमारे दीड कोटी फेसबुक अकाऊंट गेल्या वर्षभराच्या कालावधीत बंद झाले असल्याची धक्कादायक बातमी झळकली आहे. हे खरे आहे की, अमेरिकेतील लोक स्वत:च्या वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत, स्वत:च्या अधिकारांबाबत कमालीचे जागरूक आहेत. गुगलने जुने-नवे मित्र मिळवून देण्याचे आमिष दाखवत संकलित केलेली आपली खाजगी माहिती, तो डाटा कुण्या खाजगी कंपन्यांना विकावा अन्मग त्या कंपन्यांनी त्या माहितीचा वापर करत, त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीचा मारा आपल्या फेसबुक पेजवरून करावा, हे काही तिथल्या लोकांना रुचलं नाही. हा प्रकार त्यांना त्यांच्या अधिकारांचे हनन करणारा वाटला. सुरुवातीच्या काळात फेसबुक म्हणजे लोकांसाठी मित्र-मैत्रिणी मिळविण्याचे एक माध्यम तर होतेच, शिवाय स्वत:च्या भावना, विचार व्यक्त करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणूनही त्याची गणना होऊ लागली होती. नंतरच्या काळात त्याचे व्यावसायिक स्वरूप उघड होत गेले. एकीकडे गुगलद्वारे लोकांची खाजगी माहिती इतर कुण्यातरी तिर्हाईतांसमोर उघड करण्याची तर्हा जगजाहीर झाली, तर दुसरीकडे मित्रपरिवारातील सदस्यांनी टाकलेल्या पोस्टस्च्या तुलनेत जाहिरातींच्या भरमसाट मार्यामुळेही लोकांचा त्रागा होऊ लागला. पण, तो व्यक्त करण्याचा मार्ग गवसत नव्हता. अमेरिकन लोकांनी तो मार्ग स्वत:पुरतायापद्धतीने शोधला असल्याचे आता स्पष्ट होते आहे.

अर्थात हे झाले अमेरिकेचे. भारतात मात्र चित्र याच्या नेमके उलट आहे. अमेरिकेच्या तुलनेत, फेसबुक वापरणार्या भारतीयांची संख्या अधिक असल्याचे गुगलची आकडेवारी सांगते. एकूणच जगभरातील तरुणाई फेसबुकचा नाद सोडून इतर विविध समाजमाध्यमांकडे वळत असल्याचे निष्कर्ष वेगवेगळ्या सर्व्हेक्षणातून समोर येत असताना, भारत मात्र गुगलसाठी सर्वात मोठेमार्केटठरले असल्याचे वास्तव अद्याप अबाधित आहे आणि भारतीय जनता ही त्यांच्यासाठीचेग्राहक!’ तसेही जगातील सर्वच व्यापार्यांच्या दृष्टीने हा देश नेहमीचबाजारपेठठरला आहे- लुटण्याच्या इराद्याने आलेल्या मोगलांपासून तर ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत... इतिहास तर तेच वास्तव अधोरेखित करतो. गुगलही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. मुळात, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून केवळग्राहकाच्याभूमिकेत जगण्यासाठी तमाम भारतीयांची धडपड चाललेली असताना, व्यापार्यांनी तरी का म्हणून आपला माणसाच्या पातळीवर विचार करावा? मग आपल्या अधिकारांचे हनन झाले काय नि आपल्या भावभावना पायदळी तुडवल्या गेल्या काय, फरक काय पडतो इथे कुणाला? बरं! लोकांना तरी कुठे स्वत:च्या अधिकारांची चिंता आहे? व्यक्तिगत स्वातंत्र्य, स्वत:चे अधिकार, इतरांचे अधिकार, त्यांचे स्वातंत्र्य, समोरच्या व्यक्तीच्या नकाराधिकाराचे महत्त्व तर आपल्या लेखी शून्य असते कायम. पाश्चात्त्यांच्या स्वैराचारावर खूप तोंडसुख घेतो आपण. पण, इतरांच्या नकाराधिकाराचा आदर करण्याची त्यांची रीत मोठ्या मनाने स्वीकारता कुठे आली आहे आपल्याला? तसे असते, तर ना इथे बलात्काराच्या घटना घडल्या असत्या, ना कनिष्ठांनी नकार दिला म्हणून वरिष्ठांचे इगो दुखावले गेले असते! इथे तर राजकारण्यांनी सातत्याने पाच वर्षांच्या बोलीने मतदारांचा लिलाव मांडला आजवर. निवडणुकीत आश्वासनं द्यावीच लागतात, ती दरवेळी पूर्ण केलीच पाहिजे असं कुठाय्‌, असं बिनदिक्कतपणे म्हणत स्वत:च्याच शपथा निर्लज्जपणे खुंटीवर टांगल्यात त्यांनी. दर निवडणुकीनंतर सर्वसामान्य जनतेच्या वाट्याला केवळ फरफट तेवढी येत राहिली, तरी वाईट वाटत नाही इथे कुणालाच. वर पुन्हा स्वत:च्या भावनांचा बाजार मांडायला सिद्ध होतात लोक. अशा स्थितीत गुगलने आपली माहिती इतर कुणाला तरी विकल्याची खंत कुणी व्यक्त करण्याची, त्यावरून कुणी अकांडतांडव करण्याची, गुगलचे प्रशासन भारतीय जनेकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता तशी नव्हतीच कधी. शासकीय पातळीवर या संदर्भात झालेल्या विचारणेचा अपवाद वगळता तसे घडलेही नाही कुठे काही, कुणी दखल घेण्याजोगे.

गुगलला दोष देण्यात अर्थ नाही. ती तर शेवटी एक व्यापारी कंपनी आहे. त्यांनी यशस्वी व्यापाराचे प्रचलित फंडे उपयोगात आणले. सुरुवातीला तर सारंकाही फुकटात असल्याचे सांगत सुटले ते. आम्हीही टाळ्या पिटून दाद दिली त्यांना. आपल्या मोबाईल फोनवर, संगणकावर सोशल मीडियातला कोणताही अॅप वापरायला नेट कनेक्शनदेखील आवश्यक असतं. त्यासाठी पैसे भरावे लागतात, हे विसरूनच गेलेत लोक. त्यांना अॅप फुकटात उपलब्ध असल्याचाच भारी आनंद. मग या बाबी बिनपैशाने उपलब्ध करून दिल्याबद्दल गुगलचे आभार मानत त्याचा चोवीस तास वापर सुरू झाला. इतका की, आता लोकांना सोशल मीडियाचे व्यसन लागत चालले असल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. आणि मजेदार बाब अशी की, सोशल मीडिया हाताळतच त्या बातम्यांचे अवलोकन चालले आहे आणि आता पूर्णपणे फेसबुक, व्हॉटस्अॅपच्या आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्ती मोहिमेची गरजही प्रतिपादित होऊ लागली, तेव्हाही लोक त्याच तटस्थतेने स्वत:ची गणनात्यागटवारीत न करता, इतरांकडे तुच्छतेने बघण्यात धन्यता मानू लागले आहेत. तिकडे, लोकांना आपल्या विळख्यात जखडून धरण्याचे व्यापारी तंत्र गुगल प्रशासनाद्वारे यशस्वीपणे अंमलात येत गेले. सामाजिक माध्यमांवर नवनवीन प्रयोग सुरू झालेत. पूर्वीच्या एकुलत्या एकलाईकच्या चिन्हाच्या जोडीला आता हास्य, राग, लोभ, प्रेम, कौतुक अशा विविधांगी भावना व्यक्त करणारे पर्याय उपलब्ध झालेत. वेगवेगळे वेबसाईटस्असोत की मग फेसबुक, लोक दिवसभरात नेमका कशाचा शोध घेतात, त्यांची आवड नेमक्या कोणत्या क्षेत्रातली आहे, याचा अभ्यास करणारी यंत्रणा गुगलने विकसित केली. छुप्या पद्धतीने वापरकर्त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केला जाऊ लागला. त्याच्या आवडीच्या, अभ्यासाच्या अशा विषयांवरील माहिती, माणसं, जाहिराती त्याच्यासमोर टाकल्या जाऊ लागल्या. त्या क्षेत्राशी संबंधित विविधांगी पर्यायांची पखरण त्या त्या व्यक्तीसमोर केली जाऊ लागली. लोकांनाही त्याची भुरळ पडू लागली. व्यावसायिक दृष्टीने विचार केला, तर गुगल पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय बाजारपेठ त्यांनी एव्हाना काबीज केली आहे. त्यांच्या फंद्यात पडलेल्या भारतीय जनतेला मात्र व्यसनाधीन ठरवण्याची वेळ आली आहे.

यातही गंभीर बाब ही की, सार्या जगात तरुणाई या विश्वातून बाहेर पडण्यासाठी धडपडतेय्‌, तर मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील लोक मात्र मोठ्या प्रमाणात या जाळ्यात अडकले आहेत. अडकत आहेत. आपला अमूल्य वेळ यात वाया घालवत आहेत. एकीकडे विभक्त कुटुंबपद्धतीपासून तर अन्य विविध कारणांमुळे व्यक्तिगत आयुष्यात आलेले एकटेपण, तर दुसरीकडे आपल्या सामाजिक रचनेमुळे सामूहिक जीवनशैलीत आपल्या खाजगी आयुष्यातील यशापयश, चढउतार, आनंद-दु:ख इतरांसोबत वाटून घेण्याच्या, त्यात लोकांना सहभागी करून घेण्याच्या, स्वत: त्यात सहभागी होण्याच्या रीतीमुळेही असेल कदाचित, पण असे घडतेय्खरे. भारतीय जनसमूहाचे राजकारणातील मर्यादेबाहेरच्या स्वारस्यामुळेही असेल बहुधा, पण या माध्यमांवर राजकीय मतभिन्नताही अलीकडे युद्धाचे स्वरूप धारण करून व्यक्त होऊ लागली आहे. कित्येकदा तसे करताना स्तर अबाधित राखण्याचे भानही उरत नाही अनेकांना.

एकूण, सोशल मीडियाच्या जगात इतरांच्या तुलनेत काहीतरी वेगळेच चालले आहे आपले. वैश्विक पातळीवर लोक त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग धुंडाळीत असताना, शेवटचा उपाय म्हणून कित्येकांनी फेसबुकचे अकाऊंटच बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेतला असताना, आपण भारतीय लोक मात्र त्यात खोलवर गुरफटत चाललो आहोत दिवसागणिक. यातून लोकांना बाहेर काढण्याची निकड त्यातूनच निर्माण झाली आहे. योग्य रीतीने वापरले तर हे एक उत्तम हत्यार, एक चांगले उपकरण, उपयुक्त साधन सिद्ध होऊ शकते. पण... समाजहितासाठीच्या, दर्जेदार चर्चेसाठीच्या त्याच्या उपयोगितेपेक्षाही त्याला राजकीय आखाडा बनवून एकमेकांचे शरसंधान करायला निघालेल्यांचीच गर्दी अधिक जाणवू लागली आहे आताशा. दुष्परिणाम पुढ्यात आहेत...

@@AUTHORINFO_V1@@