अपरिवर्तनीय कर्जरोख्यांत गुंतवणूक करावी का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019   
Total Views |



कंपन्या भागभांडवल शेअरच्या रूपाने जसे विक्रीस काढतात, तसेच कंपन्या, वित्तीय संस्था किंवा अन्य आस्थापने त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जनतेसाठी कर्जरोखे सार्वजनिक विक्रीस काढतात. कर्जरोख्याचे विक्रीमूल्य निश्चित असते. गुंतवणुकीचा कालावधी निश्चित असतो. या गुंतवणुकीवर देण्यात येणारे व्याजाचे दर निश्चित असतात. गुंतविलेल्या रकमेवर वेळोवेळी व्याज दिले जाते, त्यांना ‘परिवर्तनीय कर्जरोखे’ म्हटले जाते व ज्या कर्जरोख्यांची गुंतविलेली पूर्ण रक्कम गुंतवणूकदारांना मूदतपूर्तीच्या वेळी परत केली जाते, अशा कर्जरोख्यांना ‘अपरिवर्तनीय कर्जरोखे’ म्हटले जाते. हल्ली बाजारात अपरिवर्तनीय कर्जरोखेच विक्रीस येतात. बँका किंवा पोस्ट कार्यालये बचत खात्यातील रकमेवर जे व्याज देतात, त्यापेक्षा कर्जरोख्यांच्या गुंतवणुकीत जास्त व्याज मिळते.

कंपन्यांना किंवा वित्तीय संस्थांना दीर्घकाळासाठी निधी हवा असल्यास या कंपन्या, वित्तीय संस्था कर्जरोखे विक्रीस काढतात. यात गुंतवणूक करण्यापूर्वी के्रडिट रेटिंग पाहून घ्यावे. यात परतावा निश्चित दराने मिळतो. पण, जर कर्जरोखे विक्रीस काढलेल्या कंपनीला तुमचे व्याज देता आले नाही किंवा मूळ रक्कमही परत करणे अशक्य झाले, तर तुम्ही आर्थिक अडणचीत येऊ शकाल. तुम्हाला पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. त्यामुळे ‘ट्रिपल ए’ (ए-ए-ए) हेरेटिंग असलेल्या कर्जरोख्यांतच गुंतवूणक करावी. ज्या कंपनीचे कर्जरोखे विकत घेणार, त्या कंपनीचा इतिहास बघा. तिचे औद्योगिक क्षेत्रातील स्थान बघा. तिचे आर्थिक व्यवहार बघा. हे सगळे योग्य वाटले तरच गुंतवूणक करा.

ज्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि ज्यांना जास्त दराने आयकर भरावा लागतो, अशांसाठी हा गुंतवणूक पर्याय योग्य मानता येणार नाही. जर तुम्ही सर्वाधिक आयकर भरण्याच्या ‘बॅ्रकेट ’ मध्ये असाल, तर या गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजावर तुम्हाला तीसहून अधिक दराने आयकर भरावा लागणार. परिणामी, तुमच्या हातात फार कमी दराने व्याज पडणार. ज्यांचे उत्पन्न करपात्र नसते, तसेच ज्यांना कमी दराने आयकर भरावा लागतो, अशांसाठी हा गुंतवणुकीचा पर्याय योग्य आहे. कोणताही गुंतवणूक पर्याय निवडताना आयकर भरावा लागल्यामुळे खरोखरीचा किती परतावा हातात मिळणार, हे लक्षात घ्यावयास हवे. व्याजदर ‘ट्रिपल ए’ रेटिंग असलेल्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांवर दरसाल दरशेकडा साधारणपणे ९ टक्के दराने व्याज दिले जाते. हे व्याज बँकांकडून मिळणार्‍या व्याजापेक्षा नक्कीच जास्त असते. पण, ज्या कर्जरोख्यांचे रेटिंग सर्वोत्कृष्ट नाही किंवा कमी आहे, अशा कर्जरोख्यांवर जास्त दराने व्याज मिळू शकते. पण, या जास्तीच्या व्याजाला भुलू नका, नाहीतर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. जास्त काम म्हणजे जास्त जोखीम, हे नेहमी लक्षात असू द्या. कर्जरोखे विकणारी कंपनी जर अडचणीत आली तर तुम्हाला तुमचे व्याज व मूळ रक्कम वसूल करणे कठीण जाईल.

व्याज मिळण्याचा कालावधी


तुम्हाला या गुंतवणुकीवर मासिक
, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक जसे व्याज हवे तसे मिळू शकते किंवा चक्रवाढ व्याजदराने मुदतपूर्तीच्या वेळी पूर्ण मूळ रक्कम व त्यावर पूर्ण कालावधीचे एकत्र व्याज घेतले तर ती रक्कम हातात जास्त पडते. तुमच्या आर्थिक गरजांनुसार व्याज घेण्याचा कालावधी तुम्ही ठरवू शकता.

गुंतवणुकीचा कालावधी

या कर्जरोख्यांचा गुंतवणूक कालावधी दीर्घकालीन असतो. ज्यांना जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणे शक्य असते, अशांनीच यात गुुंतवणूक करावी. निश्चित उत्पन्न देणारी अन्य अनेक उत्पादनेही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्याशी तुलना करून तुम्ही गुंतवणुकीस योग्य पर्याय निवडू शकता.


अल्पबचत योजना

सरकारच्या अल्पबचत संचलनालयाचे अल्पबचतीचे गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

         योजनेचे नाव                       मिळणार्‍या व्याजाचा दर

    • · ज्येष्ठ नागरिक बचत योजना                ८.७० टक्के
    • · सुकन्या समृद्धी खाते                        ८.५० टक्के
    • · सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना (पीपीएफ) ८.०० टक्के
    • · राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी)            ८.०० टक्के
    • · १ ते ५ वर्षांच्या कालावधीची ठेव योजना         ६.९० टक्के ते ७.८० टक्के
    • · किसान विकास पत्र                          ७.०० टक्के
    • · मासिक उत्पन्न खाते                         ७.७० टक्के
    • · रिकरिंग ठेव योजना                          ७.३० टक्के
    • · बचत खाते                                  ४.०० टक्के
    • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीयोजना

ही दीर्घकालीन म्हणजे १५ वर्षांच्या कालावधीची गुंतवणूक योजना आहे. ७ वर्षांनंतर काही ठराविक रक्कम काढता येते. सध्या या गुंतवणुकीवर वर्षाला ८ टक्के दराने व्याज मिळते. यात दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक तुम्ही करू शकता. निश्चित उत्पन्न व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. यातील गुंतवणूक सर्व पातळ्यांवर पूर्णत: करमुक्त आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही ५ वर्षांची अल्पबचत गुंतवणूक योजना आहे. या योजनेत सध्या ८ टक्के दराने व्याज मिळत आहे. मूळ रकमेत दरवर्षी व्याजाची रक्कम समाविष्ट केली जाते व मुदतपूर्वीच्या वेळी ही एकत्रित रक्कम गुंतवणूकदाराला परत मिळते. यात किमान १०० रुपये व त्या पटीत गुंतवणूक करता येते. पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत यातील रक्कम तुम्हाला परत मिळू शकत नाही. पण, ही प्रमाणपत्रे तारण ठेवून तुम्ही कर्ज घेऊ शकता. हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. सध्या गुंतवणुकीत बरेच धोके असताना हा अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

 

किसान विकास पत्र

सध्या या गुंतवणुकीवर ७.७ टक्के दराने व्याज मिळते. यातील गुंतवणुकीवर आयकर सवलत मिळत नाही. मात्र, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजनेवर व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे योजनेवर आयकर सवलत मिळते. लहान मुलांसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास हा पर्याय चांगला आहे. एखाद्या लहान मुलाला वाढदिवसाला किंवा मुंजीत रोख रक्कम देण्यापेक्षा किंवा खेळणी देण्यापेक्षा हे किसान विकास पत्र द्यावे. मुदतपूर्तीच्या वेळी मूळ रकमेत, व्याजाच्या रकमेत वाढ होऊन त्याच्या हातात चांगली रक्कम पडेल व त्याचे पालक ती विधायक कामांसाठी वापरू शकतील.

 

सुकन्या समृद्धी खाते योजना

ही योजना फक्त मुलींसाठी आहे. दहा वर्षांहून कमी वयाच्या मुलींसाठी हे खाते उघडता येते. यात सध्या वर्षाला ८.५ टक्के दराने व्याज मिळते. मुलीचे वय २१ वर्ष झाल्यावर या खात्याची मुदतपूर्ती होते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर जमलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम काढता येऊ शकते. तुम्हाला मुलगी असेल तर निश्चित उत्पन्नासाठी ही योजना चांगली असते. सध्या केंद्रात असलेल्या सरकारने ही योजना सुरू केली आहे.

 

पोस्ट कार्यालयातील ठेव योजना

१ ते ५ वर्षांच्या गुंतवणूक कालावधीवर ६.९० टक्क्यांपासून ७.८० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. जवळजवळ बँकांत मिळणार्‍या व्याजाएवढेच व्याज या गुंतवणुकीवर मिळते. यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. पण, बँकांमध्ये तुम्हाला ज्या दर्जाची ग्राहकसेवा मिळते ती ग्राहकसेवा तुम्हाला पोस्टाच्या कर्मचार्‍यांकडून मिळत नाही. बँकेच्या आत गेल्यावर जी प्रसन्नता जाणवतेे, ती पोस्ट कार्यालयात गेल्यावर जाणवत नाही.

g.shashank२५@gmail.com

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@