राफेल लिंबू आणि गंधपुष्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019   
Total Views |




भाजप किंवा शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष असल्याने त्यांनी हा अशुभ काळ पथ्य म्हणून पाळला
, तर समजू शकते. ते अंधश्रद्धेचेच भगत आहेत. पण ज्यांना राफेल विमानाच्या पूजेची वा चाकाखाली लिंबू ठेवण्याची लाज वाटली, त्यांना पितृपक्षात अर्ज भरण्याची भीती कशाला वाटली असावी? त्याचे कारण राजनाथ यांना जे वाटले त्यापेक्षा किंचीतही वेगळे नाही. आपल्या बाबतीत असे काही नसल्यावर कोणीही हाडाचा पुरोगामी अथवा विज्ञानवादी असतो. पण विषय आपल्या घरातला वा जीवनातला असल्यावर मात्र बहुतांश विज्ञानवादी अंधश्रद्ध होऊन जातात. त्याचा कुठलाही गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहुना गुपचूप आपापल्या अंधश्रद्धा जपल्या जातात. त्याचे चित्रण कुठल्या कॅमेर्‍याने होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात असते. त्यामुळे त्यांची झाकलेली मूठ सव्वालाखाची असते. पण अधूनमधून कुठे छुपा कॅमेरा समोर आला, मग त्यांची झाकली मूठही उघडी पडते. याचे शेकडो किस्से सांगता येतील.



विजयादशमीचा मुहूर्त साधून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी फ़्रान्सला जाऊन ताब्यात मिळणार्‍या पहिल्या राफेल लढाऊ विमानाचे रितसर पूजन केले
. तत्काळ आपल्या देशातील उथळ पुरोगामी विज्ञानवादी बुद्धिमंतांच्या व राजकारण्यांच्या अकलेला चालना मिळाली. सध्या महाराष्ट्रात निवडणुका लागलेल्या असल्याने इथे बारीकसारीक गोष्टींना अतिशय प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे सिंह यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची केलेली पूजा, चर्चेचाकिंवा टिंगल-टवाळीचा विषय करण्यात आला. बुद्धिमंत लोक एकवेळ समजू शकले असते. पण काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही त्यावर टिप्पणी करावी, याचे नवल वाटले.



अर्थात
, त्यात कुठलीही नवलाई नाही. वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यालाच धूर्तपणा समजणार्‍यांच्या जगात असे विज्ञानवादी असंख्य प्रमाणात जन्माला येत असतात. त्यामुळे विमानाच्या चाकापाशी चिरडायला ठेवलेली लिंबं आणि विमानाच्या वर ठेवलेला नारळ अनेकांना खुपला तर योग्यच आहे. पण अशा बाबतीत टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर येऊन टवाळी करणार्‍यांच्या प्रतिक्रिया टिपणार्‍यांची बुद्धी कुठे चक्कर येऊन पडली होती, त्याचे नवल वाटते. कारण, ज्या राजकीय नेत्यांनी राफेलच्या पूजेसाठी नाके मुरडली, त्यापैकी कोणत्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराने पितृपक्ष चालू असताना उमेदवारी अर्ज कशाला भरलेले नव्हते? असा प्रतिप्रश्न एकाही पत्रकार शहाण्याला का सुचला नाही? महाराष्ट्रात 27 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण 29 तारखेपर्यंत पितृपंधरवडा चालू होता, तोपर्यंत कुठल्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज का दाखल केला नाही? महाराष्ट्रात पितृपक्ष हा कालावधी कुठल्याही शुभकार्यासाठी अपशकुन मानला जातो. ही अर्थातच श्रद्धा किंवा पुरोगामी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञानवादाची खुमखुमी आहे, त्या पुरोगामी पक्षांनी तरी आपल्या उमेदवारांना त्याच कालखंडात अर्ज दाखल करण्याची सक्ती करण्यास काय हरकत होती?



भाजप किंवा शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष असल्याने त्यांनी हा अशुभ काळ पथ्य म्हणून पाळला
, तर समजू शकते. ते अंधश्रद्धेचेच भगत आहेत. पण ज्यांना राफेल विमानाच्या पूजेची वा चाकाखाली लिंबू ठेवण्याची लाज वाटली, त्यांना पितृपक्षात अर्ज भरण्याची भीती कशाला वाटली असावी? त्याचे कारण राजनाथ यांना जे वाटले त्यापेक्षा किंचीतही वेगळे नाही. आपल्या बाबतीत असे काही नसल्यावर कोणीही हाडाचा पुरोगामी अथवा विज्ञानवादी असतो. पण विषय आपल्या घरातला वा जीवनातला असल्यावर मात्र बहुतांश विज्ञानवादी अंधश्रद्ध होऊन जातात. त्याचा कुठलाही गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहुना गुपचूप आपापल्या अंधश्रद्धा जपल्या जातात. त्याचे चित्रण कुठल्या कॅमेर्‍याने होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात असते. त्यामुळे त्यांची झाकलेली मूठ सव्वालाखाची असते. पण अधूनमधून कुठे छुपा कॅमेरा समोर आला, मग त्यांची झाकली मूठही उघडी पडते. याचे शेकडो किस्से सांगता येतील.



आज उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ नावाचा धार्मिक पथ्ये पाळणारा मुख्यमंत्री आहे आणि त्याला मुहूर्त व धर्म
-कर्मकांड करण्याची बिलकूल लाज वाटत नाही. पण धर्माच्या शास्त्रापलीकडे ज्याला निव्वळ समजूत व अंधश्रद्धा मानले जाते, त्याला मात्र योगी कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री असताना ‘नोएडा’ला जाण्याची हिंमत केलेली आहे. मात्र, त्यांच्या आधी जे दोन पुरोगामी मुख्यमंत्री उत्तरप्रदेशाला लाभलेले होते, त्यांना कधी अशा अंधश्रद्धेला आव्हान देण्याची हिंमत झालेली नव्हती. गेल्या दोन-तीन दशकांपासून उत्तरप्रदेशच्या राजकारणात अशी ठाम समजूत आहे की, जो मुख्यमंत्री ‘नोएडा’नामक औद्योगिक परिसराला भेट देतो वा कार्यक्रम तिथे करतो, त्याची सत्ता जाते. म्हणून मायावती वा अखिलेश यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात चुकूनही त्या भागात कुठला कार्यक्रम योजला नाही वा तिकडे फिरकले नाहीत. अर्थात, त्यामुळे त्यांना सत्तापद गमावण्यापासून सवलत मिळाली नाहीच.



थोडक्यात सांगायचा मुद्दा इतकाच की
, पुरोगामी म्हणून मिरवणारे अधिक अंधश्रद्ध असतात. किंबहुना पुरोगामित्व मिरवायचे म्हणून असल्या इतरांच्या वागण्याला नाके मुरडणे, ही आजकाल फॅशन झालेली आहे. तसे नसते, तर रामलिला मैदानावर मनमोहन सिंग किंवा सोनिया-राहुल तरी रावणाला बाण मारायला कशाला गेले असते? त्यांच्या प्रतीकात्मक बाण सोडण्याने कुठला रावण मेला नाही किंवा दिल्लीतल्या रावणवृत्तीला वेसण घातली गेली नाही. पण त्यांनाही मतांसाठी असली लाचारी करावी लागली. लोकसभा निवडणुकीत मते हवी म्हणून राहुल गांधी जनेयुधारी ब्राह्मण असल्याचा डंका पुरोगाम्यांनीच कशाला पिटला असता? असे लोक अधिक भंपक विज्ञानवादी असतात. राजनाथ यांनी राफेल विमानाची विधिवत पूजा केली असेल आणि लिंबू-मिरची बांधली असेल, तर बिघडत नाही. निदान त्यांची असल्या भोंदूगिरीवर श्रद्धा तरी असेल. पण राहुल किंवा त्यांच्या ब्राह्मण्याचे कौतुक सांगणार्‍यांचे काय? नुसता ब्राह्मण नाही, तर जनेयुधारी ब्राह्मण असल्याचे कौतुक करणारेच आता राफेल विमानाच्या पायाशी असलेल्या लिंबासाठी नाक मुरडतात ना? हा सार्वत्रिक प्रकार असतो.



किती पुरोगामी निवडणुका जिंकण्यासाठी तिरूपती वा तत्सम देवस्थानाच्या पायर्‍या झिजवित असतात
? तेव्हा यापैकी कितीजणांनी नाके मुरडलेली? अर्थात, अशा वादाला तोंड फुटले, म्हणजे त्याला काटशह देणार्‍या अंधश्रद्धांचेही पुरावे समोर आणले जातात. सोशल मीडियात लगेच अवकाशयानात भ्रमण करणार्‍या अंतराळवीरांच्या अंगावर होली वॉटर शिंपडले जाण्याचेही व्हिडिओ तत्काळ शोधून टाकलेले आहेत. तोही मूर्खपणाच आहे. कारण, जशी ज्यांची श्रद्धा किंवा समजूत असेल, तसेच कुठल्याही देशातील व समाजातील लोक वागत असतात. ज्यांना कुठल्याही श्रद्धा चुकीच्या वाटतात, तेही एकप्रकारे श्रद्धाळूच लोक असतात. देव नाही म्हणणारेसुद्धा देव नसल्याचा कुठला पुरावा देऊ शकत नसतात. अमूक नसल्याचा दावा फक्त करतात. तीही एक अंधश्रद्धाच असते ना? भाजप किंवा संघ जातीयवादी असल्याची एक अंधश्रद्धा कितीकाळ आपल्या बौद्धिक प्रांतामध्ये बोकाळलेली आहे?



गेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर मायावतींनी मतदान यंत्रावर शंका घेतली आणि तमाम पुरोगामी अंधश्रद्धाळूंनी त्यांना उचलून पालखीत बसवले ना
? ते यंत्र ‘हॅक’ होऊ शकते किंवा त्यात घोटाळा करता येतो, हे शास्त्रशुद्ध रितीने सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान यापैकी एक पुरोगामी विज्ञानवादी स्वीकारू शकला आहे का? पण त्याचा गवगवा किती जोरात चालू आहे? कुठलाही पुरावा नसताना किंवा कुठेही सिद्ध झालेले नसतानाही छातीठोकपणे इव्हीएम वाद उकरून काढणारे थोडे आहेत? कोणीतरी सांगितले, कुठेतरी ऐकले अशा गावगप्पांच्या आधारे इव्हीएम यंत्राविषयी गावभर अफवा पिकवित सुटलेले शरद पवार विज्ञानवादी आहेत? असतील तर राफेल विमानाच्या पायाशी लिंबू ठेवणारे राजनाथही विज्ञानवादीच असतात.



कारण
, पवार किंवा तत्सम लोक ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि राजनाथसिंह यांनी ऐकलेल्या अपशकुनाच्या वा अशुभाच्या संकेतांना मानलेले आहे. हातात फलक घेऊन कोणी दाभोळकरांच्या खुन्याला पकडण्यावर आंधळा विश्वास ठेवत असेल किंवा चर्चासत्र भरवून कलबुर्गी वा अन्य कुणाला न्याय मिळत असेल, तर लिंबू चिरडल्याने राफेल विमानाला वाईट नजर लागणार नाही, यावर विश्वास का ठेवायचा नाही? श्रद्धा तुमची असली की खरी आणि आमची असली की आंधळी, असे कुठल्याही शास्त्रात किंवा विज्ञानात सांगितलेले नाही. ज्यांना साधे पितृपक्षात निवडणुकांचे अर्ज भरण्याची किंवा आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याची हिंमत होत नाही, त्यांनी राजनाथ यांच्या पूजेला किंवा लिंबांना नाक मुरडण्याची गरज नाही. मदर तेरेसांच्या भोंदूगिरीवरचा संपादकीय लेख शेपूट घालून मागे घेणार्‍या बुद्धिमंत व संपादकांना तर मुरडायला नाकसुद्धा असू शकत नाही आणि असते तर त्यांची अशी केविलवाणी परिस्थिती कशाला झाली असती? जे पितरांच्या आत्म्याला घाबरून जगतात, त्यांनी लिंबाला हसायचे कारण आहे काय?

@@AUTHORINFO_V1@@