चमच्यांच्या गर्दीत हरवलेले अपात्र नेते!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |

 

 

 
स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान काही लोकांनी स्वीकारलेल्या इंग्रजांच्या मिंधेपणाचा अपवाद सोडला, तर बहुतांश, त्याग, बलिदानाच्या वेदीवर उभे राहिलेले तत्कालीन संघटन हळूहळू स्वार्थाच्या वाटेवर मार्गक्रमण करू लागले. संस्थात्मक पातळीवर मिळालेली लोकप्रियता काही व्यक्ती आणि कुटुंबांचे उंबरठे झिजवत राहिली. पक्षाचा कारभार मोजक्या चार-दोन लोकांच्या परिघात अन्सत्तेची सूत्रं मूठभर कुटुंबांच्या मुठीत बंदिस्त होऊ लागली. हा प्रकार मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगणारी, चुकीच्या निर्णय-धोरणांना तात्त्विक विरोध करणारी माणसं नापसंत ठरून कस्पटासमान लेखली जाऊ लागली. त्यांना अस्पृश्य ठरवून सर्वच गोष्टींपासून दूऽऽर... वेशीबाहेर ठेवले जाऊ लागले. मिंध्या लाचार, लाळघोट्यांची गर्दी सत्ताधार्यांच्या सभोवताल जमू लागली. नव्हे, त्यांचीच चलती वाढली. त्यातून उद्भवलेली अनियंत्रित परिस्थिती अहंकाराची किनार लेऊन थयथयाट करू लागली.
 

सत्तेची सूत्रं एकाच कुटुंबापर्यंत मर्यादित राहणे काहींना सोयीचे वाटू लागले. ती तशीच राहावी म्हणून त्यांची धडपड सुरू झाली. स्वत:ची शक्ती विसरून कुणाच्या तरी समोर कुर्निसात करीत हयात घालवणार्यांची उणीव नव्हतीच कधी इथे! त्यांच्याच तालमीत आणि सल्ल्याने नेत्यांची जडणघडण होत गेली. कार्यकर्ता हा पक्षाचीताकदठरण्याचे दिवस मागे पडले. संघटनेप्रमाणेचकार्यकर्त्याचेअस्तित्वही नेत्यांच्या चरणी लीन होत राहिले. त्याग-बलिदानाची परिभाषा बदलली. तत्त्वासाठी जगणार्यांची गणना मूर्खात होऊ लागली. त्याऐवजी स्वार्थाच्या बाता करणारी मंडळी व्यवहारी अन्म्हणूनच हुशार ठरली. मोठ्या चलाखीने त्यांनी बड्या नेत्यांभोवती कडबोळे करत त्यांना घेरले. अशात, आर्थिक नाड्या मुठीत आवळून बसलेल्यांनी मागे राहण्याचे कारण नव्हतेच! औद्योगिक घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारी मूठभर मंडळी लाचार कडबोळ्याहून सरस ठरली. स्वत:च्या ताकदीची कल्पना असल्याने, सत्तेत कोण, याची चिंता वाहण्याची गरज त्यांना कधी पडली नाही. कालांतराने त्याचाही प्रभाव जाणवू लागला. गोरगरिबांच्या हिताच्या निर्णय-धोरणांची निश्चिती गर्भश्रीमंतांच्या मर्जीने ठरू लागली. सभोवताल गर्दी करून बसलेले चमचे अन्ओैद्योगिक घराण्यांचा प्रभाव या चौकटीत मर्यादित झालेल्या नेत्यांच्या पसंतीने, गरजेनुसार पक्षसंघटन चालू लागले. आदेशाबरहुकूम वागणार्यांची, तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द ओंजळीत अलगद टिपण्यासाठीच्या स्पर्धेत अहमहमिकेने उतरलेल्यांची, अकारण वाहवा करणार्यांची संख्या नको तितकी वाढली. सरकारी लवाजामा, सुविधांची खैरात... यात वहावलेल्या नेत्यांची एकूणच सर्व यंत्रणांवरील पकड ढिली पडत गेली आणि नेतृत्वही आपोआपच प्रभावहीन होत गेले...

 

विरोध सोडा, आपण मांडलेल्यापेक्षा वेगळे मत मांडण्याचाही कुणी प्रयत्न केला, तर तेही खपेनासे झाले नेत्यांना. त्यामुळे त्यांनी काहीही बोललं तरी त्याची फक्त री ओढण्याचेच काम इतरांकडे शिल्लक राहिले. या परिस्थितीत, नेत्याला विरोध करण्याची हिंमत राहिली नाही कुणाचीच. केलाच कुणी प्रयत्न तसा, तरी त्याची तर्हा बदलली. विनम्रतेच्या निचांक पातळीवरच्या त्या विरोधाची धार आपसूकच बोथट होत गेली. कशापेक्षा काहीतरी महत्त्वपूर्ण ठरले अन्सारे चित्रच बदलत गेले. नेत्याचे मत लोक आणि पक्षहितापेक्षाही श्रेष्ठ ठरत असल्याचे वास्तव बिनदिक्कतपणे स्वीकारणार्या शहाण्यांच्या गर्दीत बिनडोकांचे महत्त्व वाढत गेले. दुर्दैव एवढेच की, बिनडोकांच्या आनंदोत्सवात सहभागी होत टाळ्या पिटणार्यांच्या घोळक्यात सामील झालेल्या शहाण्यांनाही कधीच काही वावगे वाटले नाही. या प्रवासाचा परिणाम एकच झाला. लायक लोकांची जमात दिवसागणिक नामशेष होत गेली. त्यांचे महत्त्वही लोप पावू लागले. गरज तर नावालाही उरली नाही. भक्तांना विठ्ठलापर्यंत पोहोचण्यात अडथळा आणणार्या बडव्यांचे प्रमाण नको तितके वाढले. संघटना, संस्था, राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी लायकीपेक्षा घराणे महत्त्वाचे ठरू लागले. कारण, पात्रता असणारी मंडली लाचारी पत्करून मौन पाळून बसली, तर क्षमता नसणार्यांच्या मताला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. अशा पद्धतीनेवारसाहक्कानेनेतृत्वाची माळ गळ्यात पडली की पितळ कसे उघडे पडते, लाभलेल्या सुवर्णसंधीचे कसे मातेरे होते, नसलेले गुण असल्याचा आव आणण्याच्या नादात कुणाचे कसे हसे होते, याचा अनुभव सारा देश गेले काही दिवस घेतो आहे.

 

केवळ कॉंग्रेसच नाही, इतरही काही राजकीय पक्षांच्या नेतृत्वाबाबतची गुणांची ही असलीच उधळण, राजकारणाच्या गर्तेत वास्तवाचा पडलेला विसर, कुणीतरीआपलंअसल्याचे सिद्ध करण्याच्या तालात आपल्याच मातीशी वैर सांगण्यासाठीची अनाठायी धडपड क्षणोक्षणी सिद्ध होते आहे. यात राहुल गांधींना शिखांच्या दंगलीशी कॉंग्रेसचा संबंध नसल्याचा खोटा दावा करावासा वाटला, सुप्रिया सुळेंना हिंदूंच्या पूजापद्धतीवर आक्षेप नोंदवावासा वाटला, तिकडे अखिलेश यादवांना मुस्लिम समाजातील मुलींबाबतची आत्मीयता अचानक उफाळून आली, तर राज बब्बर यांना पंतप्रधानांबद्दल पातळी सोडून बरळण्याची नितान्त अशी गरज जाणवली. कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदींना गुजरातेत हार्दिक पटेलांवरून एक अडचणीचा प्रश्न विचारला गेला, तर एका टॉक शोमध्ये त्यांचा भडका उडाला. राहुल गांधींना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडल्याच्या वृत्ताची शाई अद्याप वाळलेली नसताना, महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला पडू लागलेल्या सत्ताप्राप्तीच्या स्वप्नांची बातमी येऊन धडकली आहे. राहुल गांधी यांनी संघकार्याची मुस्लिम दहशतवादाशी केलेली तुलना तर बिनडोकपणाचे अफलातून उदाहरण ठरावे! कुठे एकमेकांचे मुडदे पाडायला सरसावलेले दहशतवादी अन्कुठे काश्मीरपासून तर केरळपर्यंतच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून गुडघाभर चिखल तुडवत मदत सामग्री घेऊन लोकांपर्यंत पोहोचलेले स्वयंसेवक? पण, करता काय? गांधी बरळले. मन मानेल तसं. असले काहीबाही बिनधास्तपणे बरळण्याचा परवाना घेऊनच जन्माला आलेत ते. त्यांना कोण काय म्हणणार? घराण्याचा वारसाच एवढा मोठा लाभलाय्त्यांना की, मी मी म्हणवणारी बडी बडी मंडळी बाजूला ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद पदरी पडलेय्त्यांच्या. त्या माध्यमातून आलेल्या जबाबदारीचे भान राखायचे सोडून, शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अभ्यास न करताच तद्दन फालतू, बेताल बडबडत कसे सुटतात, हे जगाला सांगण्यासाठीचा अट्टहास चाललाय्त्यांचा स्वत:चाच.

 

दोष त्यांचा नाहीच. दोषी कॉंग्रेस पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने चालवलेली ही हास्यास्पद फालतूगिरी जराशीही आक्षेपार्ह वाटत नाही. उलट, राजकारणाच्या नावाखाली त्या फालतूपणाचेही समर्थन करण्याचा अनाकलनीय प्रयत्न होतो, तेव्हा तरकार्यकर्तानामक समूहाचीच कीव करावीशी वाटते. हीच बाब, केवळ मुलायमिंसहांचे पुत्र म्हणून अखिलेशचे नेतृत्व अन्बेताल वागणेसहर्षस्वीकारणार्यांनाही लागू होते आणि पवारकन्या म्हणून सुप्रियांचा उदोउदो करणार्यांनाही! कुठे गांधीजींच्या उपस्थितीत नेहरूंच्या एखाद्या कथनावर स्वत:चे असे वेगळे मत ठामपणे मांडणारे सरदार पटेल... फक्त मनभेदाच्या टोकापर्यंत जाऊ नका, असे सांगत आपसातील भिन्न मतांचे समर्थन करणारे अटलजी कुठे अन्राहुल, प्रियंका, सुप्रिया, अखिलेशच्या कुठल्याही म्हणण्याला माना डोलावत हो ला हो लावणारी, हुजरेगिरी करण्यात रमलेली होयबांची गर्दी कुठे? परिणाम कशाचा आहे कुणास ठाऊक, पण वर्षानुवर्षे हे असंच चाललं आहे, हे मात्र खरं...!

@@AUTHORINFO_V1@@