कॉमनवेल्थचा इतिहास ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




भारत १९४७ साली स्वतंत्र्य झाला आणि त्याचप्रमाणे ब्रिटीश राजवटीच्या अधिपत्याखालून अनेक देशांनी स्वत: ला स्वतंत्र्य करून घेतलं. हे सर्व होण्याआधी भारत आणि इतर सर्व देश जे ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते त्या देशांमध्ये एक स्पर्धा भरविण्याची कल्पना जॉन अस्टली कूपर याने लिहिलेल्या एका वृत्तपत्रात मांडली होती. त्यानंतर १९३० सालापासून ह्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. यास्पर्धांमध्ये एकूण ५३ देश आपला सहभाग नोंदवतात. ही सर्व माहिती देण्याचे कारण म्हणजे आजपासून २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सना सुरूवात होते आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू नेहेमीच उत्तम प्रदर्शन करत असतात. याही वर्षी भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करून भारताचे नाव उंचवतील अशी प्रत्येक भारतीयाची आशा आहेच.


इतिहास - 


१८९१ साली जॉन अस्टली कूपर याने आपल्या लेखात ही संकल्पना मांडली होती. यानंतर १९११ साली राजा जॉर्ज व्ही यांचा राज्याभिषेक झाल्याच्या निमित्ताने अॅथलॅटिक्स, मुष्टीयुध्द, जिमनॅस्टिक अश्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका यासारखे देश सहभागी झाले होते. प्रथम ब्रिटीश एम्पायर गेम्स म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा १९३० पासून कॉमनवेल्थ गेम्स म्हणून नावारूपाला आली. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया, भारत, न्यूझीलंड कॅनडा अश्या विविध देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.



खेळाची सुरूवात -


क्वीनस् बॅटन रीलेने याची सुरूवात करण्याची परंपरा आहे. राणी एलिझाबेथ हिच्या हातून एक संदेश घेऊन बंकिंहॅम पॅलेस मधून ही बॅटन घेऊन खेळाडू निघतात आणि जगामध्ये ही बॅटन फिरवली जाते. याचा शेवट या स्पर्धेच्या प्रारंभी ही बॅटन पुन्हा राणी किंवा तिच्या प्रतिनिधींच्या हातात सुपुर्त करून आणि संदेश वाचून केली जाते आणि यानंतर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडतो.


सहभागी देश -


भारत, ऑस्ट्रलिया, स्कॉटलंड, नायजेरिया, सिंगापूर, जमैका, टोंगो, युगांडा, मालदिव्हज, मलेशिया, केनिया, झिब्वावे यासारखे एकूण ५३ देश यामध्ये सहभागी होतात.


खेळ -


या स्पर्धेत जिमनॅस्टिक, स्वॅश, स्विमिंग, अॅथलॅटिक्स, बॅडमिंटन, मुष्टीयुध्द, बास्केटबॉल, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट असे विविध खेळ खेळले जाणार आहेत.

२०१० साली भारतात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धां या वादग्रस्त ठरल्या होत्या. २०१० साली झालेले कॉमनवेल्थ गेम्स हे सर्वात जास्त महागडे गेम्स झाल्याचे म्हणले जाते. यावेळी आयोजकांवर पैसे खाल्याचे, भ्रष्टाचार, लोकांच्या पैश्याची उधळपट्टी केल्याचे आरोप करण्यात आले होते.जे काही प्रमाणात सिध्द ही झाले होते.





दरम्यान, आजपासून ही स्पर्धा ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी झालेले खेळाडू उत्तम खेळ करून आपल्या देशाचे नाव उंचावतील यात तीळमात्र शंका नाही.


- पद्माक्षी घैसास
@@AUTHORINFO_V1@@