‘अमृत’चे काम पूर्ण होताच रस्त्यांची दुरुस्ती करा : खा.पाटील

    18-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 
अमृत योजनेच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची काम पूर्ण होताच दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना खा.ए.टी.नाना पाटील यांनी दिल्यात. ते जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत बोलत होते.
 
केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. या योजनांची अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणेने व्यवस्थितरीत्या करून खर्‍या लाभार्भ्यांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून द्यावा.
 
शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागांनी तालुका पातळीवर मेळावे घेऊन योजनांची माहिती नागरिकांना करून द्यावी. असे सांगून खा. पाटील यांनी पं. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती आढावा घेताना जिल्ह्यात आतापर्यंत 6700 वीज कनेक्शन देण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.
 
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देताना कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात 127.14 किमी लांबीच्या 38 रस्त्यांची कामे झाली आहेत.
 
तसेच मूलभूत सुविधा उपक्रमांतर्गत दूरसंचार विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 1149 ग्रामपंचायतींपैकी 640 ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ते बनविण्यासाठी 144 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.
 
गिरणा पूल ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या रस्त्याला साईडपट्ट्या दुरुस्तीचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येणार, जळगाव विमानतळ येथे 24 तास विमानाने उरविण्याची सोय 31 मार्च 2019 पर्यंत करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी या विषयाचा आढावा घेताना सांगितले.