
पाकिस्तान टेररिस्तान बनला आहे अस काल भारतातर्फे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत स्पष्ट करण्यात आलं. हे खरमरीत भाषण केलं त्यांचं नाव इनम गंभीर. भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाच्या त्या पहिल्या सचिव आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी भारताला उद्देशून केलेल्या भाषणानंतर इनम यांनी कडक शब्दात भारताचा पक्ष मांडला. ज्यामुळे इनम यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. कोण आहेत इनम गंभीर ..
इनम गंभीर या मुळच्या दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत. त्यांनी त्यांच पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. इनम या गणित विषयाच्या पदवीधर आहेत. दिल्ली विद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी आपला पुढचं शिक्षण जिनिव्हा येथून पूर्ण केल आहे. उच्चशिक्षित असलेल्या इनम यांनी २००५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली ज्यामध्ये त्यांची निवड भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये झाली. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या इनम यांना कला आणि संस्कृतीची जाण तर आहेच शिवाय त्यांच त्यावर विशेष प्रेमदेखील आहे.
भारतीय परराष्ट्र सेवेत रूजू झाल्यानंतर इनम गंभीर यांना पहिल्यांदा स्पेनमधील माद्रिद येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अर्जेंटिना आणि ब्राझील येथील भारतीय दूतावासात काम केले. त्यानंतर त्या भारतात परतल्या. भारतात परराष्ट्र मंत्रालयात काम करताना त्यांच्याकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या देशांची जबाबदारी देण्यात आली होती. दिल्लीत काम केल्यानंतर इनम यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या स्थायी सचिव म्हणून करण्यात आली. याचबरोबर त्या ही जबाबदारी पेलणाऱ्या सर्वात लहान तरूण अधिकारी आहेत. इनम या कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी असून देखील त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना इतक्या लहान वयात त्यांना सचिवपद देण्यात आलं आहे जे खूप कमी वेळा पाहिला मिळतं.
गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या सभेतही भारताकडून इनम यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणाला पातिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक आहे असं म्हणत सणसणीत प्रत्युत्तर दिलं होता. आणि यावर्षी दहशतवादाची भूमी – टेररिस्तान असं म्हणत पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर चपराक लगावली आहे.
- पद्माक्षी घैसास